MADHYA PRADESH POLICE RESHUFFLE saam tv
देश विदेश

10 IPS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; महत्वाच्या शहरातील पोलीस आयुक्त बदलले, कोणाची कुठे नियुक्ती?

10 IPS Officers Transferred: मध्य प्रदेशच्या गृह विभागाने पोलीस विभागात मोठा फेरबदल केला आहे. 10 IPS आणि 127 राज्य पोलीस सेवा अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून, कोणाची कुठे नियुक्ती झाली जाणून घ्या.

Omkar Sonawane

मध्यप्रदेशच्या गृह विभागाने रविवारी रात्री राज्याच्या पोलीस विभागात मोठा फेरबदल केला आहे. तब्बल 10 आयपीएस आधिकारी आणि 127 राज्य पोलीस सेवा अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. या अधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या पुढील आदेशापर्यंत लागू राहणार आहेत. प्रसिद्धपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, मनीष भारद्वाज यांची इंदूर शहरातील कोतवाली विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी ते भोपाळ येथील सायबर पोलीस मुख्यालयात उपपोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते.

आलोक कुमार वर्मा यांची रिवा शहराच्या सिटी सुपरिटेंड ऑफ पोलीस पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी ते देवास येथे सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. वैभव प्रिया यांची रतलाम येथून बदली करून बुऱ्हाणपूर जिल्ह्यातील नेपाननगरच्या SDOP पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर शुभम सिंह ठाकूर यांची जबलपूरमधून बदली करून नरसिंहपूर जिल्ह्यातील गाडरवारा SDOP म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच मनोज कुमार यांची ग्वाल्हेरहून बदली करून भोपाळ शहरातील एमपी नगर ACP पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

इतर महत्वाच्या बदल्यांमध्ये लेखराज मीना यांची छतरपूरहून रतलाम जिल्ह्यातील सैलाना SDOP म्हणून काजल सिंह यांची उज्जैनहून सागर जिल्ह्यातील खुरई SDOP म्हणून तर राजीव अग्रवाल यांची रिवाहून धार जिल्ह्यातील कुक्षी SDOP म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

दीपांशु यांच्याकडे मनावर SDOP पदाची जबाबदारी

दीपांशु यांची सागरहून बदली करून धार जिल्ह्यातील मनावर SDOP पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर अमित कुमार यांची खंडवा येथून बदली करून सिंगरौली SDOP म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या बदलीच्या यादीत 2023 बॅचच्या चार आणि 2024 बॅचच्या सहा IPS अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आज पाऊल उचललंय, पुढे हात उचलला जाईल', ठाकरेंचा इशारा

वाहनचालकांनो लक्ष द्या! ठाणे-बेलापूर रोडवर ४ रात्र वाहतूक बंद; काय आहे कारण, पर्यायी मार्ग कोणते? जाणून घ्या

Weight Loss : आठवड्याभरात बारीक व्हायचंय? रोज फक्त २० मिनिटं करा 'हे' काम, वजनात दिसेल फरक

टँगो पंच, ठोकी संत्राच्या बनावट दारूचे ६०० बॉक्स जप्त; नवी मुंबईत खळबळ

Maharashtra News Live Update: मंत्री बावनकुळे यांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला जनता दरबार

SCROLL FOR NEXT