MP Viral News
MP Viral News Saamtv
देश विदेश

MP News: अबब; Online लग्नाची बातच न्यारी! वधू- वर अमेरिकेत अन् भटजी भारतात; दक्षिणा ऐकून चक्रावून जालं

Gangappa Pujari

Seoni Online Marriage: सध्या सर्वत्र लग्नाचा सीझन सुरू आहे. त्यामुळे लग्नातील अनेक गमती जमतीच्या बातम्या आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मात्र सध्या उत्तरप्रदेशमधील एका अनोख्या ऑनलाईन विवाह सोहळ्याची जोरदार चर्चा होत आहे. या लग्नाची खासियत म्हणजे हे लग्न सातासमुद्रा पल्याड अमेरिकेत लागले. मात्र मंत्र पठण व्हिडिओ कॉल द्वारे उत्तरप्रदेशमधून झाले. काय आहे हे संपूर्ण प्रकरण, चला जाणून घेवू...

ऑनलाईन विवाह सोहळा...

याबाबत अधिक माहिती अशी की, मध्य प्रदेशातील (MP) सिवनी नगरच्या बारापठार भागातील रहिवासी सुनील उपाध्याय हे दांपत्य राहतात. त्यांचा मुलगा देवांश उपाध्याय आणि पुण्यात (Pune) राहणारी सुप्रिया दोघेही अमेरिकेत नोकरी करतात. या दोघांनाही लग्न करायचे होते, पण कामामुळे ते भारतात येऊ शकले नाहीत. त्यांची अडचण पाहून सुनील उपाध्याय यांनी पत्नीसह अमेरिका गाठली.

वधू वर अमेरिकेत अन् पंडीत उत्तर प्रदेशात..

अमेरिकेत लग्नासाठी पंडितजींचा शोध सुरू असताना सुनील उपाध्याय यांनी हे लग्न आमच्या सिवनी येथील पंडितजी राजेंद्र पांडेच लावतील असा हट्ट धरला. या अनोख्या मागणीने सर्वांचीच पंचाईत झाली. मात्र त्यावरही मार्ग शोधत पंडित जी ऑनलाइन व्हिडिओ कॉलमध्ये सहभागी होतील असे ठरले. आणि व्हिडिओ कॉलवर मंत्र पठण करुन लग्न लावले जाईल, अशी योजना आखण्यात आली. (Latest Marathi News)

किती मिळाली दक्षिणा....

21 मे रोजी हा ऑनलाईन विवाह सोहळा पार पडला.विशेष बाब म्हणजे वधू-वरांचे नातेवाईक अमेरिकेत पोहोचले आहेत.सवनी मधून पंडित राजेंद्र पांडे यांनी ऑनलाइन सहभागी होऊन सर्व विधी पूर्ण केले. लग्नात 57 जण सहभागी झाले होते. तसेच हिंदू प्रथेप्रमाणे पंडितजींना दक्षिणा म्हणून त ५१०० अमेरिकन डॉलर्स (४.२० लाख) मिळाले.

पंडितजींनी सांगितला अनुभव..

या हटके लग्न सोहळ्याबद्दल बोलताना पंडितजींनी सांगितले की, हा त्यांच्या आयुष्यातील पहिला अनुभव आहे, जेव्हा त्यांनी परदेशात राहणाऱ्या जोडप्याचे ऑनलाइन लग्न केले. कोरोनाच्या काळात त्यांनी चार जोडप्यांची ऑनलाईन लग्ने केली आहेत. कॅनडा आणि अमेरिकेत राहणाऱ्या भारतातील तीन कुटुंबांसाठी त्यांनी ऑनलाइन सत्यनारायण भगवान कथा ऐकवली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये दोन ठिकाणी दहशतवादी हल्ले; पर्यटक आणि भाजपच्या नेत्यावर गोळीबार

Relationship Tips: लग्नाआधी भावी जीवन साथीदाराला विचारा 'हे' ३ प्रश्न; नाहीतर आयुष्यात येतील दुःख

Chandu Champion Trailer: कार्तिक आर्यनच्या चित्रपटाचा 'चॅम्पियन' ट्रेलर रिलीज

ED कडून थेट अटक करण्यावर आता बंधनं, PMLA वर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

RCB vs CSK IPL 2024 : बेंगळुरूची प्लेऑफमध्ये एन्ट्री पक्की; चेन्नई आयपीएलमधून बाहेर

SCROLL FOR NEXT