मागील वर्षभरापासून देशात हार्ट अटॅकच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यामध्ये तरुण मुलांचं प्रमाण सर्वाधिक आहे. रस्त्यावरून चालताना, क्रिकेट खेळताना तसेच डीजेच्या तालावर नाचताना अनेकांचा हार्ट अटॅकने जीव गेलाय. अशीच एक धक्कादायक घटना मध्य प्रदेशातून समोर आली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
एका २६ वर्षीय तरुणाला धावत्या बाईकवर अचानक हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आला. अवघ्या १० सेंकदातच या तरुणाने आपल्या लहान भावासमोरच जीव सोडला. अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
राहुल राईकवार (वय २६) असं मृत तरुणाचे नाव असून तो इंदूर शहरातील मुसाखेडी गावचा रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल हा रविवारी (१८ फेब्रुवारी) दुपारच्या सुमारास घरातील वस्तूंची खरेदी करण्यासाठी आपल्या लहान भावासोबत घराबाहेर निघाला होता. (Latest Marathi News)
लहान भाऊ दुचाकी चालवत असल्याने राहुल हा पाठीमागे बसला होता. दरम्यान, वाटेतच राहुलच्या छातीत अचानक कळ आली. काही क्षणातच तो धावत्या बाईकवरून खाली कोसळला. परिसरातील नागरिकांनी तत्काळ राहुलला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
मात्र, तोपर्यंत खूपच उशीर झाला होता. राहुलचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. या घटनेनं राहुलच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. राहुलला अवघ्या दीड वर्षाची मुलगी आहे. वडिलांना अचानक काळाने हिरावून घेतल्याने चिमुकलीच्या डोक्यावरचं छत्र हरवलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.