Uttar Pradesh  Saamtv
देश विदेश

Madhya Pradesh News: रामनवमीच्या दिवशी मोठी दुर्घटना! विहिरीवरील छत कोसळल्याने 25 हून अधिक भाविक पडले; बचावकार्याला सुरूवात

Ram Navami 2023: दरवर्षी रामनवमीनिमित्त मंदिरात भव्य कार्यक्रम आयोजित केला जातो. यावेळीही यज्ञ केला जात होता. ज्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.

Gangappa Pujari

Madhya Pradesh News: देशभरात रामनवमीचा उत्साह सुरू असतानाच मध्यप्रदेशमधून (Madhya Pradesh) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मध्य प्रदेश इंदूरमधील जुनी पोलीस स्टेशन हद्दीतील बेलेश्वर मंदिरात ही घटना घडली. मंदिरात हवन आणि पूजा सुरू असतानाच अचानक मंदिराच्या आवारात बांधलेल्या विहिरीवरील (Well) छत कोसळले. यामध्ये २५ हून अधिक लोक मंदिराच्या खाली असलेल्या विहिरीत पडल्याची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत चार जणांना विहिरीतून बाहेर काढण्यात आले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. (Latest Marathi News)

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, दरवर्षी रामनवमीनिमित्त (Ram Navami) मंदिरात भव्य कार्यक्रम आयोजित केला जातो. यावेळीही यज्ञ केला जात होता. यामध्ये सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने लोक पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे. मंदिरात लोक पूजा अर्चा करत होते.

मंदिरात एक पायऱ्यांची विहिर होती, ज्यावर दहा वर्षांपूर्वी छत टाकण्यात आलं होतं. पूजेच्या वेळी 20 ते 25 लोक विहिरीच्या छतावर उभे होते, त्याच वेळी छत खचलं. छत कोसळल्याने सुमारे 20 ते 25 जण विहिरीत पडले. दरम्यान ही विहीर सुमारे 50 फूट खोल असल्याचं सांगण्यात येत आहे.

अपघाताची माहिती मिळताच प्रदेश आमदार आकाश विजयवर्गीय आणि माजी मंत्री जितू पटवारी हेही घटनास्थळी पोहोचले. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. त्याचवेळी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दुर्घटनेनंतर डीएम आणि आयुक्तांशी फोनवर चर्चा केली आणि अडकलेल्या भाविकांना लवकरात लवकर बाहेर काढण्याच्या सूचना दिल्या आहेत.

बचावकार्याला सुरुवात..

विहिरीत पडलेल्या लोकांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. अपघातानंतरही बराच वेळ अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि अम्ब्युलन्स घटनास्थळी पोहोचलेल्या नव्हत्या. दरम्यान, एसडीआरएफच्या पथकाने घटनास्थळी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. आता एक एक करून पायरीमध्ये अडकलेल्या सर्वांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election : महिला नेत्यांबद्दल अपमानास्पद वक्तव्ये केली तर कठोर कारवाई; निवडणूक आयोगाकडून गंभीर दखल

IND vs SA 1st T20I: केव्हा, कुठे रंगणार भारत- दक्षिण आफ्रिका पहिला टी-२० सामना? इथे पाहा फुकटात

Maharashtra News Live Updates: मिरारोड मध्ये पोलिस ठाण्यात हाणामारी

CM Eknath Shinde News : उद्धव ठाकरेंची यांची मशाल घराघरांत आग लावणारी; एकनाथ शिंदे यांचा धाराशिवातून घणाघात

Amit Shah : राहुल गांधींची चौथी पीढी आली तरी...; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगलीतून काय इशारा दिला?

SCROLL FOR NEXT