Madhya Pradesh news Saam Tv
देश विदेश

Shocking : कायद्याचा रक्षकच कुटुबियांच्या मारहाणीचा बळी ठरला, धक्कादायक कारण समोर, काय घडलं?

Madhya Pradesh : शिवपुरी जिल्ह्यात निवृत्त पोलिस उपअधीक्षक प्रतिपाल यादव यांच्यावर पत्नी व दोन मुलांनी पैशाच्या वादातून हल्ला केला. घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Alisha Khedekar

  • शिवपुरीत निवृत्त डीएसपीवर पत्नी व मुलांनी पैशाच्या वादातून हल्ला

  • घटनेचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद होऊन सोशल मीडियावर व्हायरल

  • गावकऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे प्रतिपाल यादव यांची सुटका

  • पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला; पत्नीचा मानसिक स्थितीवर दावा

मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील चांदवानी गावात घडलेल्या धक्कादायक घटनेने स्थानिक समाजच नव्हे तर संपूर्ण राज्य हादरून गेले आहे. एका निवृत्त पोलिस उपअधीक्षकावर (डीएसपी) स्वतःच्या पत्नी आणि दोन मुलांनीच घरगुती वादातून अमानुष वागणूक दिल्याचा प्रकार उघड झाला आहे. पैशांच्या वादातून घडलेली ही घटना मोबाईल फोनमध्ये कैद झाली असून त्यानंतर ती सोशल मीडियावर चक्क व्हायरल झाली. या घटनेमुळे गावात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून कुटुंबातील आर्थिक मतभेद किती टोकाला जाऊ शकतात याचे हे गंभीर उदाहरण मानले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निवृत्त अधिकारी प्रतिपाल सिंह यादव यांना त्यांच्या पत्नी माया यादव आणि मुलं आकाश व आभास यांनी चक्क बांधून ठेवले. या वेळी त्यांनी प्रतिपाल यादव यांचे हात-पाय दोरीने घट्ट बांधले होते. इतकेच नव्हे तर त्यांचा मोबाईल फोन आणि एटीएम कार्ड देखील हिसकावून घेतले. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगा त्यांच्या छातीवर बसलेला तर दुसरा त्यांचे हात-पाय बांधताना स्पष्ट दिसतो. या व्हिडिओतून हल्ल्याची गंभीरता लक्षात येत असून, स्थानिक नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

या प्रकारात गावकऱ्यांनी मोठा धाडस दाखवला. त्यांनी तातडीने हस्तक्षेप करून प्रतिपाल यादव यांना पत्नी आणि मुलांच्या तावडीतून सोडवले. त्यानंतर हा व्हिडिओ वेगाने व्हायरल झाला आणि प्रकरण सर्वत्र चर्चेचा विषय बनले. स्थानिकांच्या मते, या घटनेमागे आर्थिक वादच प्रमुख कारण आहे. प्रतिपाल यादव हे गेल्या १५ वर्षांपासून पत्नी आणि मुलांपासून वेगळे राहत होते. मात्र, त्यांच्या निवृत्ती नंतर मिळालेल्या लाखो रुपयांच्या रकमेवरून या वादाला सुरुवात झाली होती.

घटनेनंतर प्रतिपाल यादव यांनी पत्नी आणि मुलांविरुद्ध औपचारिक तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. दुसरीकडे, आरोपी पत्नी माया यादव यांनी स्वतःचे बचाव करताना धक्कादायक दावा केला आहे. त्या म्हणाल्या की, "प्रतिपाल यादव यांची मानसिक स्थिती स्थिर नाही. ते वेडे आहेत. आम्ही फक्त त्यांना आमच्यासोबत नेण्याचा प्रयत्न केला." मात्र घटनास्थळी कैद झालेल्या व्हिडिओतून परिस्थिती पूर्णपणे वेगळी असल्याचे स्पष्ट होत आहे.

या प्रकरणी पिछोर विभागाचे डीएसपी यांनीही घटनेची पुष्टी केली आहे. त्यांनी सांगितले की, "अलीकडेच सेवानिवृत्त झालेले डीएसपी प्रतिपाल यादव यांच्यावर पत्नी व मुलांनी हल्ला केला. त्यांनी त्यांना बांधून ठेवले, त्यांचा मोबाईल व एटीएम कार्ड घेतले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे." या घटनेने निवृत्त पोलिस अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

laxman Hake : जरांगेंची चाटायची चाटा, पण आधी राजीनामा द्या; 'पापड्या' म्हणत हाकेंचा राष्ट्रवादीच्या आमदारावर हल्लाबोल,VIDEO

Shilpa Shetty Gnapati Bappa: शिल्पा शेट्टी यंदा गणपती बसवणार नाही? कारण काय?

विराट कोहलीनं चोपलं, तरीही अक्कल नाही आली... पाकिस्तानी गोलंदाज म्हणतो, Asia Cup मध्ये भारताला हरवू

Manoj Jarange: मुख्यमंत्र्यांचे ओएसडी मनोज जरांगेच्या भेटीला; "मी आजारी आहे, मला कधीही काही होऊ शकतं" – जरांगेचं भावनिक विधान|VIDEO

Apurva Gore: कसे सरतील सये माझ्याविना दिसं तुझे...

SCROLL FOR NEXT