Bhopal Fire News Saam TV
देश विदेश

Bhopal Fire News : भोपाळमध्ये मंत्रालयाच्या इमारतीला भीषण आग; महत्वाची कागदपत्रे जळून खाक

Bhopal Mantralaya Fire News : भोपाळच्या मंत्रालयातील इमारतीला भीषण आग लागलीये. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची अनेक वाहने घटनास्थळी दाखल झालेत.

Ruchika Jadhav

Madhya Pradesh :

भोपाळमध्ये आगीची मोठी घटना घडली आहे. भोपाळच्या मंत्रालयातील इमारतीला भीषण आग लागलीये. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची अनेक वाहने घटनास्थळी दाखल झालीत.

आगीची घटना घडताच इमारतीमधील व्यक्तींमध्ये एकच खळबळ उडाली. सर्वांनी आपला जीव वाचवण्यासाठी इमारतीमधून बाहेर धाव घेतली. सदर आग इमारतीच्या पहिल्या, चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या मजल्यावर ही आग लागली आहे.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची अनेक वाहने घटनास्थळी दाखल झालीत. अग्निशमन दलाकडून आगिवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. ऑफिसमध्ये असलेली कागदपत्रे, पुठ्ठे आणि लाकडी सामानाने या आगीत मोठा पेट घेतला आहे. त्यामुळे आगीने आणखी रौद्ररुप धारण केल्याचे दिसतेय.

बाहेरून पाहिल्यास इमारतीमधून आगीचे लोट आकाशात हवेत दूरवर फेकले जात असल्याचं दिसत आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तसेच कुणालाच काही दुखापत झालेली नाहीये. मंत्रालयाच्या इमारतीला एवढी भीषण आग नेमकी कशी लागली याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही.

मंत्रालयाला आग लागली तेव्हा पाच आणि सहा क्रमांकाच्या गेटसमोर सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना इमारतीत धूर निघताना दिसला. आग लागल्याचं त्यांच्या आधी लक्षात आलं त्यानंतर सुरक्षा अधिकारी आणि अग्निशमन विभागाला याबाबत माहिती देण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: सासरच्या जाचाला कंटाळून आयुष्य संपवलं, गर्भवती महिलेने चिमुकलीसह विहिरीत मारली उडी

Crime: संसारात ढवळाढवळ, जावयाची सटकली; सासूला कायमचं संपवलं, शरीराचे १९ तुकडे करून...

Haryana: दोन गटात हाणामारी; दगडफेकीनंतर वाहनं पेटवली, अनेकजण जखमी

Vastu Tips For Money: झोपताना उशीखाली ठेवा 'या' गोष्टी, पैशांची होईल भरभराट

Ajit Pawar: राहुल गांधींच्या मतचोरीच्या आरोपांवर अजित पवारांनी दिलं बारामतीचं उदाहरण, म्हणाले...

SCROLL FOR NEXT