madhya pradesh police  Saam tv
देश विदेश

ब्लॅकमेल, खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती; पोलिसाच्या जाचामुळे तरुणाने आयुष्य संपवलं

madhya pradesh shocking : ब्लॅकमेल, खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती पोलिसासहित चौघांनी तरुणाना दाखवली. त्यानंतर या तरुणाने आयुष्य संपवल्याची घटना उघडकीस आली आहे.

Vishal Gangurde

तरुणाने आत्महत्या केल्याची घडली घटना

तरुणाने आत्महत्येपूर्वी लिहिली चार पानी चिठ्ठी

आत्महत्येने परिसरात खळबळ

मध्य प्रदेशच्या मैहर भागात एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. अमरपाटनमधील पोलिसाच्या जाचामुळे तरुणाने आत्महत्या केली आहे. तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी चार पानी चिठ्ठी लिहिली. तसेच त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये पोलीस कर्मचाऱ्यासहित ४ जणांवर ब्लॅकमेल, खोटा गुन्ह्यात फसवणे आणि बेकायदेशीरपणे पैसे उकळल्याचा आरोप तरुणाने केलाय. तरुणाच्या आत्महत्येने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अनंतराम पटेल असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. अनंतराम पटेलचा भाऊ संदिप कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनंतरामने आत्महत्या करण्यापूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट आणि व्हिडिओ शेअर केला होता. या पोस्टमध्ये मानसिक त्रास, छळ झाल्याचा आरोप केला होता. पोलिसाच्या जाचामुळे आयुष्य संपवत असल्याचे तरुणाने नोटमध्ये नमूद केले होते.

तरुणाने पोस्टमध्ये लिहिले की, 'चार जणांनी मिळून मला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. त्यामुळे मी घाबरून माझ्याकडून ५ लाख रुपये उकळले'.

अनंतरामने लिहिलेल्या नोटमध्ये लिहिलंय की, पोलिसांच्या जाचामुळे माझी मानस्थिक स्थिती बिघडली आहे. तरुणाने पोलीस कर्मचाऱ्यावरही गंभीर आरोप केलेत. त्याने दावा केला आहे की, मला संबंधित पोलिसाने वारंवार पोलीस स्टेशनला बोलावलं. कारवाईच्या नावाखाली वारंवार धमकावलं. तरुणाने शेवटच्या नोटमध्ये पोलीस कर्मचाऱ्याचा मोबाईल नंबर देखील लिहिलाय. तरुणाच्या आत्महत्येने परिसरात खळबळ उडाली आहे.

तरुणाच्या आत्महत्येनंतर घटनास्थळी स्थानिक लोक आणि नातेवाईक मोठ्या संख्येने पोहोचले. तरुणाच्या आत्महत्येने संतापलेल्या लोकांनी पोलीस स्टेशनसमोरच मृतदेह ठेवला. या प्रकारानंतर पोलीस स्टेशनच्या आवारात मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला. यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आरोपींवर कडक कारवाई केली जाईल, असं आश्वासन आंदोलकांना दिलं. तरुणाची सोशल मीडिया पोस्ट, व्हायरल व्हिडिओ, कॉल डिटेल आणि साक्षीदारांच्या जबाब याची पोलीस कसून चौकशी केली जाईल, असेही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सुनेत्रा पवारांची गटनेतेपदी निवड

Health Care : जास्त प्रमाणात खजूर खाल्याने आरोग्यावर होतात 'हे' 5 गंभीर परिणाम; जाणून घ्या

Inhaled insulin: डायबेटीजग्रस्तांची इन्सुलिनच्या इंजेक्शनची कटकट संपणार; आता श्वासाद्वारे घेता येणार इन्सुलिन

किचनच्या फरशीवर असणारे हट्टी डाग चुटकीसरशी काढा

Maagh Pornima 2026: माघ पौर्णिमेला करा हे 5 उपाय; पैशाची तंगी होईल कमी

SCROLL FOR NEXT