Man Becomes Billionaire for a Few Moments Saam
देश विदेश

मिडल क्लास माणूस अब्जाधीश झाला, खात्यात २८१७ कोटी जमा झाले; कारण ऐकून व्हाल थक्क

Man Becomes Billionaire for a Few Moments: धामनोडमध्ये तांत्रिक बिघाडामुळे विनोद डोंगळे क्षणभर अब्जाधीश झाले. काही मिनिटांतच किंमत पूर्ववत झाली आणि सत्य समोर आलं.

Bhagyashree Kamble

मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील धामनोड येथून एक अजब प्रकार समोर आला आहे. तांत्रिक बिघाडामुळे येथील नोटरी वकील आणि शाळेचे मालक विनोद डोंगळे काही क्षणांसाठी अक्षरश: अब्जाधीश झाले होते. त्यांच्या डीमॅट खात्यात अचानक तब्बल २८१७ कोटी रूपये जमा झाल्याचे आढळून आल्याने ते क्षणभर थक्का झाले होते.

विनोद डोंगळे यांनी लॉग इन केल्यावर पाहिले की त्यांच्या खात्यात हर्सिल अॅग्रो लिमिटेडचे १,३१२ शेअर्स दाखवत होते. प्रत्येक शेअरची किंमत तब्बल २ कोटी १४ लाख ७४ हजार रूपये इतकी होती. एकूण रक्कम सुमारे २८ अब्ज १७ कोटी ४१ लाख २९ हजार ४०८ रूपये इतकी आहे.

सुरूवातीला डोंगळे यांना ही रक्कम पाहून विश्वासच बसत नव्हता. ते म्हणाले 'क्षणभर मला वाटलं की माझं नशीब पलटलं. दिवाळीनंतर देवी लक्ष्मीनं आशीर्वाद दिला असावा', असं त्यांनी सांगितलं. एवढी रक्कम पाहून त्यांनी मुलांसाठी शैक्षणिक संस्था सुरू करण्याचाही विचार केला होता. मात्र, काही वेळातच सत्य समोर आलं. ही संपूर्ण घटना तांत्रिक बिघाडामुळे घडली असल्याची माहिती समोर आली.

थोड्याच वेळात शेअर्सची मूळ किंमत समोर आली. खात्यातील रक्कम पूर्ववत झाली. डोंगळे यांनी सांगितले की, 'शनिवारी कोर्टातून परतल्यानंतर मी माझे डिमॅट खाते उघडले. हे सर्व पाहून मला आनंदाचा धक्का बसला. पण नंतर समजले की ही केवळ तांत्रिक त्रुटी होती'. ही घटना सोशल मीडियात चांगलीच व्हायरल झाली. काही सेकंदात अब्जाधीश होण्याचा अनुभव काय असतो, हे विनोद डोंगळे यांनी अनपेक्षित अनुभवले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ऑपरेशन लोटसमध्ये शिंदेंचे 35 आमदार फुटणार? भाजपकडून शिंदेंची कोंडी?

शिवसेनेचे एबी फॉर्म राष्ट्रवादीच्या आमदाराकडे; नगराध्यक्ष आणि वीस ते पंचवीस उमेदवारांना अपक्ष लढावं लागलं

Delhi Blast: बॉम्ब स्फोटप्रकरणी तपास यंत्रणेला मोठं यश; पुलवामा येथून इलेक्ट्रिशियन तुफैलला अटक

Maharashtra Politics : ठाकरेंच्या जागेवर शिंदे-मनसे लढत; उपमुख्यमंत्र्यांच्या विरोधात मशाल पेटणार, इंजिन धावणार!

Beed Politics : 'मुंडे प्रचाराला आल्यास विपरित घडेल'; बीडमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीत धुसफूस?

SCROLL FOR NEXT