देश विदेश

Bhopal Lokayukta Raid VIDEO : ४५ हजारांची सरकारी नोकरी; घरावर धाड पडली अन् अधिकाऱ्यांचे डोळे पांढरे झाले, पैसे मोजायलाही मशिन लागली

Madhya Pradesh News : रोग्य विभागात स्टोअर कीपर म्हणून तैनात असलेले अशफाक अली 2021 मध्ये निवृत्त झाले.

प्रविण वाकचौरे

Madhya Pradesh News : मध्य प्रदेशात लोकायुक्तांच्या पथकाच्या हाती मोठं घबाड सापडलं आहे. भोपाळच्या लोकायुक्त पथकाने मंगळवारी पहाटे बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी कारवाई करताना एका सेवानिवृत्त स्टोअर किपरच्या घरावर छापा टाकला. यावेळी ४५ हजारांचा नोकरी असणाऱ्या सेवानिवृत्त स्टोअर किपरच्या घरी १० कोटींहून अधिक मालमत्ता सापडली.

लोकायुक्त टीमने भोपाळ, विदिशा आणि लाटेरी येथील ठिकाणांहून 45 लाख रुपयांचे दागिने आणि 21 लाख रुपयांची रोकड जमा केली आहे. आरोग्य विभागात स्टोअर कीपर म्हणून तैनात असलेले अशफाक अली 2021 मध्ये निवृत्त झाले.

लोकायुक्तांकडे बेहिशोबी मालमत्तेची तक्रार आली होती . तक्रारीच्या चौकशीनंतर लोकायुक्तांनी भोपाळमधील अश्फाकच्या दोन घरांवर आणि इतर ठिकाणांवर छापे टाकले. लोकायुक्तांच्या कारवाईदरम्यान, भोपाळच्या ग्रीन व्हॅलीमध्ये अशफाक अली याच्या घरातून चलनी नोटांनी भरलेली बॅग पथकाला सापडली. नोटा एवढ्या होत्या की त्या मोजण्यासाठी मशीन मागवावी लागली होती.

ग्रीन व्हॅलीतील अशफाक अली याच्या घराची किंमतची दोन कोटी रुपये आहे. याशिवाय कुटुंबातील चार सदस्यांच्या नावे 16 हून अधिक स्थावर मालमत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. कुटुंबियांच्या नावे कोट्यवधी रुपयांची स्थावर मालमत्ता खरेदी केल्याची कागदपत्रे समोर आली आहेत.

१९ कोटींचा मालमत्ता आली कुठून

लोकायुक्त डीएसपी वीरेंद्र सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, सेवानिवृत्त स्टोअर किपर अशफाक खान यांच्या प्राथमिक मूल्यांकनात त्यांच्याकडे 19 कोटींची संपत्ती असल्याची माहिती मिळाली असून तपास सुरू आहे.

अलिशान घर, महागड्या वस्तू

लोकायुक्त टीमने भोपाळच्या एअरपोर्ट रोडवर असलेल्या घरावर छापा टाकला तेव्हा आलिशान घर पाहूनच अधिकारी थक्क झाले. मॉड्युलर किचन, लाखो रुपयांचे झुंबर, फ्रीज आणि टीव्हीशिवाय महागडे सोफे आणि शोकेसही होते. मात्र ४५ हजारांची नोकरी असलेल्या अशफाककडे एवढी संपत्ती कशी कुठून आली याचा तपास अता लोकायुक्त करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ahilyanagar News: सीएनजी पंपावर कर्मचाऱ्यांची मुजोरी; वाहनात गॅस भरण्यावरून दाम्पत्याला मारहाण

Maharashtra Politics: महायुतीतील कुरघोडीमुळे शिंदे नाराज? शिंदे पुन्हा दिल्ली दरबारी

Bihar Election : निवडणुकीआधीच मुख्यमंत्र्यांची मोठी कारवाई; सत्ताधारी पक्षाने माजी मंत्र्यांसहित ११ आमदारांना केलं निलंबित

Eye Health: वारंवार डोळे चोळण्याची सवय आहे? तर वेळीच थांबवा, नाहीतर...

धनंजय मुंडेंना दणका! गोपीनाथ मुंडेंचे वारसदार कोण? पंकजा घेतली या दोन नेत्यांची नावे|VIDEO

SCROLL FOR NEXT