Illegal Activities Uncovered in Spa Centers Saam Tv News
देश विदेश

स्पा सेंटरच्या नावाखाली 'गंदी बात', पॉश एरियात वेश्याव्यवसाय; महिलेसह ११ जणांना पोलिसांनी रंगेहाथ पकडलं

Illegal Activities Uncovered in Spa Centers: मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरच्या पॉश भागात दोन स्पा सेंटरवर पोलिसांची कारवाई. वेश्याव्यवसाय सुरू असल्याचं पर्दाफाश. ११ जण ताब्यात.

Bhagyashree Kamble

मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. शहरातील पॉश भागात दोन स्पा सेंटरवर पोलिसांनी छापा टाकला आहे. पोलिसांना गुप्त माहितीच्या आधारे स्पा सेंटरवर वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली होती. माहिती मिळताच सिटी सेंटर परिसरातील एसएस आयुर्वेद स्पा सेंटर आणि ब्लॅक पर्ल स्पा सेंटरवर पोलिसांनी छापा टाकला. या दरम्यान, स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याचं उघड झालं.

पोलिसांनी पुरूष आणि महिलांना आक्षेपार्ह स्थितीत पकडले. पोलिसांनी मोठ्या प्रमाणात आक्षेपार्ह साहित्य देखील जप्त केले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक विदिता डागर यांनी स्पा सेंटरमध्ये छापा टाकला. पोलिसांनी दोन्ही स्पा सेंटरवर छापे टाकले ऑपरेटर्ससह ११ जणांना अटक केली. दोन्ही स्पा सेंटरमधून पोलिसांनी साहित्य जप्त केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी छापा टाकून पीडित महिलांची सुटका केली आहे. काही महिला ग्वाल्हेरमधील असल्याचे सांगितलं जात आहे. तर, काही इतर शहरातील असल्याची माहिती आहे. ताब्यात घेतलेल्या महिलांची सध्या पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

ब्लॅक पर्ल्स स्पामधून पोलिसांनी एका ऑपरेटरसह तीन महिला आणि एक पुरूष आढळला आहे. एसएस आयुर्वेद स्पामध्ये एका महिला ऑपरेटरसह चार महिला आणि दोन पुरूष आढळले. छाप्यादरम्यान, काही ग्राहक आणि महिला आक्षेपार्ह स्थितीत आढळल्या. सध्या पोलिसांकडून तपास सुरू असून, पोलिसांकडून कायदेशीर कारवाई केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gairan Land: मनपा-नगरपालिका क्षेत्रातील गायरान जमिनीवरील आरक्षण उठवलं; सरकारचा मोठा निर्णय

US–Iran Conflict: अमेरिका-इराण युद्ध धर्मिक वळणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा धर्मयुद्धाचा प्लॅन?

Ajit Pawar Plane Crash: जय पवारांची पत्रकार परिषद रद्द? VSR च्या मालकाचा 'बोलविता धनी' कोण?

कुत्र्याने चावा घेतल्याने म्हैस आक्रमक, अनेकांना जमिनीवर पाडलं, हल्ल्यात एकाचा मृत्यू

गाढवं पाळा, तरुण आणि श्रीमंत व्हा? गाढवाच्या कातडीपासून बनतं चमत्कारी औषध?

SCROLL FOR NEXT