Gwalior–Jhansi highway : Saam TV marathi News
देश विदेश

Accident : महामार्गावर भयानक अपघात, अलिशान गाडीचा चक्काचूर, ५ जणांचा मृत्यू

Gwalior–Jhansi Highway Accident: ग्वालियर–झांसी महामार्गावर सकाळी साडेसहा वाजता फॉर्च्यूनर आणि ट्रॅक्टरमध्ये भीषण अपघात झाला. या धडकेत कारचा चक्काचूर झाला असून पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.

Namdeo Kumbhar

  • ग्वालियर–झांसी महामार्गावर फॉर्च्यूनर आणि ट्रॅक्टरची जोरदार धडक झाली.

  • धडक इतकी भयानक होती की कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला

  • पाच जणांचा घटनास्थळी मृत्यू झाला.

  • धुके आणि अतिवेगामुळे अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला आहे.

Five people dead in early morning crash on Gwalior–Jhansi highway : मध्य प्रदेशमधील ग्वालियरमध्ये आज सकाळी साडेसहा वाजता भयंकर अपघात झाला आहे. वेगात असणाऱ्या अलिशान गाडीला ट्रॅक्टरने जोरात धडक दिली. या अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर ग्वालियर-झांसी महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. सकाळी धुक्यामुळे अधिच स्पष्ट दिसत नव्हते, त्यात कारचा वेग अतिशय होता. त्यामुळे अपघात झाल्याचा प्राथामिक अंदाज व्यक्त रण्यात येत आहे.

ग्वालियर-झांसी महामार्गावर आज सकाळी साडेसहा वाजता फ्यॉर्च्युनर आणि ट्रॅक्टर यांचा भीषण अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. अपघातग्रस्त वाहने महामार्गावरून बाजूला करण्यात आली. पोलिसांनी तात्काळ पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेतले. पोलिसांकडून मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम करण्यात येत आहे. पाचही जणांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी जवळच्या रूग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

सकाळी साडेसहा वाजता महामार्गावर भीषण अपघात झाला. महागडी फॉर्च्यूनर कार ( MP 07 CG 9006) अतिशय वेगाने झांसीकडून येत होती. कार मालवा कॉलेज जवळ वेगात येताच वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरला जोरात धडकली. ही धडक इतकी भयानक होती की कारचा चक्काचूर झाला. समोरील भागाचे तुकडे तुकडे झाले. अपघाताचा आवाज दूरपर्यंत पोहचला होता. कारचा पुढील भाग ट्रॅक्टरमध्ये घुसल्याचे फोटोत दिसतेय. अपघातानंतर स्थानिकांनी धाव घेत मदतकार्य सुरू केले होते. पोलिसांनीही तात्काळ घटनास्थळावर धाव घेतली.

या भीषण अपघातात फॉर्च्यूनर कारमधील पाच जणांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. अपघात इतका भयंकर होता की कारची अवस्था पाहून उपस्थितांच्या पायाखालील वाळू सरकली. कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला होता. पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि ग्रामस्थांच्या मदतीने बऱ्याच प्रयत्नांनंतर कटरने कार कापून मृतदेह बाहेर काढले. त्यानंतर सर्व मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले. पोलिसांकडून याबाबत गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetes Care: डायबेटीजच्या रुग्णांनी कांदा खाणं योग्य? तज्ज्ञांनी दिली महत्वाची माहिती

Relationship Tips: पार्टनरकडे गोष्टी सुद्धा मागाव्या लागतायत? तर हेच आहेत ब्रेकअपचे संकेत

Shocking News : "तुला मिळवण्यासाठी मी स्मशानात..." जादूटोण्याच्या नावाखाली महिलेवर बलात्कार, नाशिकमधील धक्कादायक घटना

Gold New Rates : सोनं ८००० रूपये झालं स्वस्त, गेल्या आठवड्यात अचनाक दर आपटले

Maharashtra Live News Update: नेव्हल डॅकमध्ये बॉम्बस्फोटाच्या धमकीचा फोन, परिसरात सर्च ऑपरेशन

SCROLL FOR NEXT