Madhya Pradesh Crime News Saam TV
देश विदेश

Madhya Pradesh Crime News: साडी खेचली, फोटो काढले अन् बेदम मारहाण करत ट्रेनखाली ढकलून दिलं; धक्कादायक घटनेनं ग्वाल्हेर हादरलं

Madhya Pradesh Crime at Moving Train: धावत्या ट्रेनमध्ये एक महिलेवर अत्याचार करण्यात आला आला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Madhya Pradesh Crime News: मुंबई लोकल ट्रेनमध्ये तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न झाल्याची घटना ताजी असतानाच आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. उत्तरप्रदेशच्या (Uttar Pradesh) ग्वाल्हेरमध्ये संतापजनक प्रकार घडला आहे. धावत्या ट्रेनमध्ये एका महिलेवर अत्याचार करण्यात आला आला आहे. एवढंच नाही तर तिला ट्रेनमधून खाली फेकण्यात आलं आहे. (Latest Crime News)

साडी सोडून बेदम मारहाण

सदर घटना सोमवारी रात्री घडली आहे. महिला आपल्या आणखीन एका नातेवाईकासह मुजफ्फरपूरहून सुरतमार्गे गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या एक्सप्रेसमधून प्रवास करत होती. यावेळी पाच अज्ञात तरुण ट्रेनमध्ये चढले. रात्रीच्यावेळी त्यांची आणि महिलेची बाचाबाची सुरु झाली. या नराधमांनी थेट महिलेची साडी सोडली आणि तिला बेदम मारहाण करत लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिच्यासोबत असलेल्या व्यक्तीला देखील मारहाण करण्यात आली.

विवस्त्र करत काढले फोटो

आरोपी एवढ्यावरच थांबले नाही. त्यांनी महिलेला विवस्त्र करत तिचे फोटोही आपल्या फोनमध्ये काढले आहेत. त्यानंतर त्यांनी महिला आणि तिच्यासह असलेल्या व्यक्तीला खाली फेकून दिले. ते दोघेही बडोडी या गावातील रेल्वे स्टेशन परिसरात पडले होते. सकाळी काही नागरिक तेथे पोहचले असता त्यांनी दोघांनाही रुग्णालयात (Hospital) दाखल केले आहे. या प्रकरणी पीडिता आणि तिच्यासह असलेली व्यक्ती गंभीर जखमी झालेत.

पीडितेने पोलिसांना या बाबत तक्रार दिली आहे. दिलेल्या तक्रारिनुसार, सुरुवातीला वाद होऊनये म्हणून महिला आणि नातेवाईक ट्रेनच्या दरवाजाजवळ जाऊन बसले होते. मात्र पाचही टवाळ मुलं तिथेदेखील पोहचली आणि वाद घालू लागली. पोलीस आता रेल्वे स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून ५ आरोपींचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sachin Tendulkar Son : सचिनचा मुलगा अर्जुनचा साखरपुडा झाला; कोण आहे तेंडुलकर घराण्याची होणारी सून?

Bank Charges: महत्त्वाची बातमी; आता बँक व्यवहारांवर आकारणार शुल्क, कधीपासून लागू होणार नियम?

Mumbai High Court: कबुतरखान्यावरून मराठीविरुद्ध जैन; हायकोर्टाकडून बंदी कायम

Adult Video: शाळेत वर्ग सुरू असतानाच एलईडी स्क्रीनवर लागला पॉर्न; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Hair Care Tips: आठवड्यातून केसांना कितीवेळा तेल लावावे?

SCROLL FOR NEXT