Madhya Pradesh Crime News : मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) खंडवामधील एका हॉटेलमधील दोन महिलांसोबत विनयभंग आणि विचित्र प्रकरण समोर आले आहे. एनजीओसाठी काम करणाऱ्या दोन महिला कर्मचाऱ्यांसोबत रविवारी रात्री हॉटेलच्या (Hotel) रुममध्ये विनयभंग झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर महिला सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशच्या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या हॉटेलमधील महिलांनी वेटरवर विनयभंगाचा आरोप लावला आहे. हॉटेलच्या रुमध्ये महिला गाढ झोपेत होत्या, त्यावेळी वेटर रुमध्ये शिरला. महिलांच्या गंभीर आरोपानंतर पोलिसांनी वेटरच्या विरोधात गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली आहे. बालीराम असे आरोपी वेटरचे नाव आहे. २२ वर्षीय वेटर बालीराम हा महिलांच्या रुमध्ये खिडकीतून गेला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पीडित महिला एनजीओच्या काम करण्यासाठी खंडवा येथे आल्या होत्या. या दोन्ही महिलांनी भोपालमध्ये हॉटेलमध्ये एक रुम बूक केला होता. मीडिया रिपोर्टनुसार, या दोन्ही महिला काम करून झाल्यानंतर हॉटेलमधील रुममध्ये झोपण्यास गेल्या.
मध्यरात्री दोन्ही महिला झोपेतून जाग्या झाल्या, त्यावेळी बालीराम अंथरुणावर झोपला होता. एक अनोळखी व्यक्ती अंथरुणावर रुमध्ये झोपल्याने दोन्ही महिला प्रचंड घाबरल्या. त्यांनी तातडीने रुममधील लाईट लावली आणि आरडाओरड करायला सुरुवात केली. त्यानंतर बालीराम रुममधून फरार झाला. त्यानंतर त्याने रुमचा दरवाजा बाहेरून बंद केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.