Madhya Pradesh Police Raid On Spa Center  Saam Tv
देश विदेश

Shocking: स्पा सेंटरच्या नावाखाली 'गंदा काम', २० तरुणींना नको त्या अवस्थेत पकडलं; पोलिसांनी धाड टाकत...

Madhya Pradesh Police Raid On Spa Center: मध्य प्रदेशमध्ये पोलिसांनी अनधिकृत स्पा सेंटरवर कारवाई केली. चार स्पा सेंटरवर पोलिसांनी छापा टाकला. याठिकाणी स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू होता.

Priya More

Summary:

  • स्पा सेंटरच्या नावाखाली नको ते काम केले जात होते

  • मध्य प्रदेश पोलिसांनी ४ स्पा सेंटवर छापा टाकला

  • या कारवाईत पोलिसांनी २० तरुणी आणि एका तरुणाला अटक केली

मध्य प्रदेशमध्ये पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मेरठमध्ये अनधिकृत स्पा सेंटरवर मोठी कारवाई करत पोलिसांनी २० तरुणी आणि एका तरुणाला अटक केली. स्पा सेंटरच्या नावाखाली याठिकाणी वेश्या व्यवसाय सुरू होता. पोलिसांनी मंगळवारी एकाच वेळी चार स्पा सेंटरवर छापे टाकले. घटनास्थळावरून पोलिसांनी २० तरुणी आणि एका तरुणाला अटक केली. या सर्वांची चौकशी सुरू आहे.

पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक दिवसांपासून मेरठ शहरातील विविध भागात काही स्पा सेंटर कोणत्याही वैध परवानगीशिवाय चालवले जात होते. या स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरू होता. याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिकांना देखील या स्पा सेंटरमुळे त्रास होत होता. त्यांनी देखील याबाबत तक्रारी केल्या होत्या.

या स्पा सेंटर्समध्ये व्हाट्सअॅप आणि इतर ऑनलाइन माध्यमातून बुकिंग केले जाते. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिस पथकाने चार वेगवेगळ्या ठिकाणच्या स्पा सेंटरवर छापे टाकले. या छाप्यादरम्यान पोलिसांना स्पा सेंटर्समध्ये रजिस्टर सापडले ज्यामध्ये अनेकांच्या नावाच्या नोंदी केल्या गेल्या होत्या. या तपासादरम्यान ग्राहकांना ऑनलाइन बुकिंग करण्यात आल्याचे उघड झाले. ज्याचे पुरावे मोबाईल फोन आणि इतर डिजिटल माध्यमांमधून जप्त करण्यात आले.

या कारवाईदरम्यान पोलिसांना काही मोबाईल फोनवर आक्षेपार्ह फोटो देखील सापडले आहेत. चारही स्पा सेंटर्सवर बेकायदेशीरपणे काम केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताब्यात घेतलेल्या महिला आणि तरुणाची चौकशी सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. पोलिस संपूर्ण नेटवर्कची चौकशी करत आहेत आणि ऑनलाइन बुकिंग आणि अनैतिक कृत्यांमध्ये आणखी कुणी सहभागी आहे का याचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भाजपचे "ऑपरेशन लोटस" 2.0, झेडपी निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपमध्ये जाणार

Gajra Hairstyles: मराठमोळा नखरा अन् केसांत माळा मोगऱ्याचा गजरा, या आहेत 5 सुंदर हेअरस्टाईल्स

Immunity Boost: आहारात या 3 पदार्थांचा करा समावेश, रोगप्रतिकारक शक्ती अन् Metabolism वाढेल; डॉक्टरांनी दिला सल्ला

Raj Thackeray: ही नवीन प्रथा कुठून आली? प्रचारासंदर्भातील आयोगाच्या निर्णयावर राज ठाकरे संतापले

Nandurbar : नवऱ्याचं दुसरीसोबत अनैतिक संबंध, बायकोला कळाल्याने अमानुष मारहाण; महिलेनं संपवलं आयुष्य

SCROLL FOR NEXT