MP Election 2023 Saam Digital
देश विदेश

MP Election 2023: मध्य प्रदेशमध्ये मतदान केंद्राबाहेर दगडफेक, दोन गटात राडा

MP Election 2023: मध्यप्रदेशमध्ये विधानसभेच्या २३० जागांसाठी आणि छत्तीसगडमध्ये ७० जागांसाठी आज मतदान होत आहे. दरम्यान मध्यप्रदेशमधील मुरैना जिल्ह्यातील दिमानी मदारसंघात शुक्रवारी दोन गटांमध्ये तुफान दगडफेक झाली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

MP Election 2023

मध्यप्रदेशमध्ये विधानसभेच्या २३० जागांसाठी आणि छत्तीसगडमध्ये ७० जागांसाठी आज मतदान होत आहे. दरम्यान मध्यप्रदेशमधील मुरैना जिल्ह्यातील दिमानी मदारसंघात शुक्रवारी दोन गटांमध्ये तुफान दगडफेक झाली. यात एकजण गंभीक जखमी झाल्याची घटना घडली आहे. या हिंसाचारामागचं कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही, एएनआयने या संदर्भातील वृत्त दिलं आहे. दरम्यान मध्यप्रदेशमध्ये सकाळी ९ पर्यंत ११.९५ टक्के तर छत्तीसगडमध्ये ५.७१ टक्के मतदान झाले.

दरम्यान छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री भूपेश बघेल, उपमुख्यमंत्री टीएस सिंह देव आणि ८ राज्यमंत्र्यांचं भवितव्य आजच्या मतदानातून ठरणार आहे. छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्यातील २० जागांसाठी ७ नोव्हेंबरला ७८ टक्के मतदान झाले. राज्यात कॉंग्रेस आणि भाजपमध्ये थेट लढत होत आहे. मात्र माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचा पक्ष आणि बसपचा प्रभाव असलेल्या बिलासपूर भागात अनेक जागांवर तिरंगी लढत होत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मध्यप्रदेशमध्ये कल्याणकारी योजना आणि विकासाच्या कोणत्याही दिर्घकालीन दृष्टीकोणाऐवजी मतदारांना त्वरित समाधान देण्याची शर्यत सुरू आहे. सध्या ज्या राज्यांमध्ये निवडणुका होतायेत त्यामध्ये मध्यप्रदेशचे दरडोई उत्पन्न सर्वात कमी आहे. दरम्यान २०१८ च्या निवडणुकीत कॉंग्रेसने २०३० पैकी ११४ जागा जिंकून सत्ता स्थापन केली होती. शिवराज सिंह यांच्या नेतृत्वाखाली भाजपने १०९ जागांवर विजय मिळला होता. त्यानंतर सिंधीया यांच्या नेतृत्वाखाली ग्वाल्हेर-चंबळमधील नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे राज्यात पुन्हा भाजपची सत्ता आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Horoscope: 'या' राशींना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळतील; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT