Madhya Pradesh bus truck accident Chhindwara details : मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमातून परत येताना ४१ जणांच्या बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये १० जणांचा मृत्यू झालाय. तर २० गंभीर जखमी आहेत. मध्य प्रदेशमधील छिंदवाडातील सेमरिया हनुमान मंदिरासमोर गुरुवारी संध्याकाळी दुर्दैवी अपघात झाला. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या 'लाभार्थी परिषदे'तून परत येत असताना बसने एका ट्रकला जोरदार धडक दिली. अपाघातामध्ये २० जण गंभीर जखमी झाले असून त्यांना जवळच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल कऱण्यात आले आहे. जखमींची प्रकृती पाहाता मृताची संख्या वाढू शकते.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या आसपास उमरानालात हा अपघात घडला. समोरासमोर ही धडक इतकी भीषण आणि भंयकर होती की बसवरील नियंत्रण सुटले आणि ती उलटली. भंडारकुंड, कारेर येथून ही बस निघाली होती. अपघातानंतर बसच्या आतमध्ये अनेक प्रवासी अडकले होते. प्रत्यक्षदर्शींच्या मते, अपघात इतका भीषण होता की एका प्रवाशाचा हात तुटला, तर इतर अनेक जण डोक्याला गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये सहा पुरुष, तीन महिला आणि एका मुलाचा समावेश आहे.
बस आणि ट्रकच्या अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि बचाव पथकाने तात्काळ घटनास्थळावर धाव घेतली. २० रूग्णवाहिकाही घटनास्थळावर दाखल झाल्या होत्या. पोलिसांकडून गर्दीवर नियंत्रण मिळवण्यात आले, तर बचावपथकाकडून मदतकार्य सुरू करण्यात आले. महामार्गावरच अपघात झाल्यामुळे ५ किमी पर्यंत रांगा लागल्या होत्या. पोलिस प्रशासनाकडून वाहतूककोंडी दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
अपघातग्रस्त बसमध्ये एकूण ४१ जण प्रवास करत होते. सर्वजण लाभार्थी परिषदेतून परत येत होते. अपघातामधील सर्व जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छिंदवाडामध्ये लाभार्थी परिषदेत सहभागी होण्यासाठी ही बस गेली होती. या कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यानंतर बस प्रवाशांसह उमरानालाकडे परत जात होती. पण त्याचवेळी काळाने घाला घातला. अपघाताची बातमी कळताच मुख्यमंत्री यादव यांनी दुख व्यक्त केले आहे. त्यांनी सर्व मदत करण्याच्या सूचना पोलिसांना आणि प्रशासनाला दिल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.