मुंबई : छावा चित्रपटानं संपूर्ण देशाला वेड लावलंय. छत्रपती संभाजी महाराजांचं स्वराज्यासाठी बलिदान पाहून प्रेक्षक भारावून गेलेत. मध्य प्रदेशच्या बुरहानपूरमध्येही लोक वेडे झालेत. मात्र ते खजिन्यासाठी तुम्ही म्हणाल छावा चित्रपटाचा आणि य़ा खजिन्याचा काय संबंध आहे? होय संबंध आहे. 'छावा' चित्रपटात बुरहानपूरमध्ये हा मुघलांचा खजिना असल्याचं म्हटलंय. इथं मुघलांनी सोन्या-चांदीची नाणी तयार केली असा इतिहास सांगितलाय आणि.तेच पाहून बुरहानपूरवासीय या परिसरात रात्रीअपरात्री सोन्याची नाणी शोधताय. बुरहानपूरमधल्या असीरगडमध्ये नागरिकांनी एक दोन नव्हे तर तब्बल 100 शेतात खड्डे खोदलेत. रात्रीच्या वेळी अगदी टॉर्च लावून शेतात खजिन्याचा शोध घेतला जातोय. नेमकं काय झालं? ते पाहूया.
नेमकं काय झालं?
इंदूर ते हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग तयार करण्यासाठी खोदकाम सुरू आहे
३ महिन्यांपूर्वी इथं शेतात नाणी सापडल्याची अफवा पसरली
छावा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यात या परिसरात मुघलांचा खजिना ठेवण्यात आल्याचा उल्लेख
तेव्हापासून खजिन्यासाठी खोदणाऱ्यांची संख्या वाढलीय
बुरहानपूरमध्ये अबुरहानपूरमध्येसीरगड किल्ल्याजवळ १०० शेतात खड्डे खोदले
मात्र सोन्या-चांदीची नाणी मिळाल्याचे समोर आलेले नाही. जर अशी नाणी मिळाली तर येथे येण्यावर निर्बंध घालू, असं पोलीस अधिक्षक देवेंद्र पाटीदार यांनी सांगितलं. तर या प्रकाराची सखोल चौकशी करणार असल्याचं जिल्हा प्रशासनानं म्हटलंय. पुरातत्त्व समितीच्या सदस्यांच्या माहितीनुसार बुरहानपूरमध्ये सोन्या-चांदीच्या नाण्यांची टांकसाळ होती. असीरगढ येथे उत्खननादरम्यान प्रत्येक वेळी काही ना काही सापडते. बहादूरशाह फारुकीच्या काळात १६०१ मध्ये अकबराने बुरहानपूर जिंकले होते. किल्ल्याजवळ नाणी मिळणे मोठी गोष्ट नाही, असं इतिहासकार सांगतात. बुरहानपूरचे नागरिक किती मालामाल झाले सांगणं कठीण आहे. मात्र या निमित्ताने असीरगड किल्ल्याचं महत्व पुन्हा एकदा अधोरेखीत झालं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.