MP Councillor Naeem Khan Dies After Controversy Over Marriage Saam
देश विदेश

भाजपच्या बड्या नेत्याचं ६७व्या वर्षी दुसरं लग्न; मुलीच्या वयाच्या तरुणीशी बांधली लगीनगाठ, पण काही दिवसात संशयास्पद मृत्यू

MP Councillor Naeem Khan Dies After Controversy Over Marriage: मध्‍यप्रदेशातील सागर शहरात नगरसेवक नईम खान यांचा संशयास्पद मृत्यू झालाय. वयाच्या ६७ वर्षी त्यांनी दुसरं लग्न केलं होतं.

Bhagyashree Kamble

मध्यप्रदेशातील सागर शहरातील लाजपतपुरा वॉर्डमधील नगरसेवक नईम खान यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. ६७ वर्षीयज नईम खान यांचा अलिकडेच २५ वर्षीय महिलेशी विवाह झाला होता. लग्न झाल्यानंतर भाजप पक्षाने त्यांच्यावर कारवाई केली. भाजपने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. आज सकाळी त्यांना अचानक अस्वस्थ वाटल्यानंतर नईम खान यांना रूग्णालयात नेण्यात आले. तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.

या घटनेनंतर पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली. नईम यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवले. या घटनेनंतर सून शिखा खान यांचे धक्कादायक विधान समोर आले आहे. शिखा म्हणाली, 'सप्टेंबर महिन्यात सासरे नईम यांनी २५ वर्षीय महिलेशी दुसरे लग्न केले. तेव्हापासून ते त्रासलेले होते. रोज होणाऱ्या वादांमुळे घरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते', अशी माहिती शिखाने दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, नईम खान हे त्यांच्या पहिल्या पत्नीचे कुटुंब सोडून शनिचरी येथील त्यांच्या ऑफिससमोरील घरात दुसऱ्या पत्नीसोबत राहत होते. सकाळी त्यांच्या सुनेला त्यांची तब्येत बिघडल्याचा फोन आला. कुटुंब त्यांच्याकडे घराकडे गेले. नातेवाईकांना तेव्हा नईम यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली.

कुटुंबाने या प्रकरणाची पोलीस चौकशी करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असं म्हटलं आहे. मृत नगरसेवक नईम खान हे गेल्या अडीच महिन्यांपासून वादात अडकले होते. वयाच्या ६७वर्षी त्यांनी २५ वर्षीय महिलेशी विवाह केला. त्याच महिलेनं नंतर त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यांच्यावर दाखल झालेल्या आरोपांमुळे त्यांची भाजपने अलिकडेच सहा वर्षांसाठी पक्षातून काढून टाकले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ऐन निवडणुकीत माजी आमदाराच्या मुलाने सोडला हात, ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश|VIDEO

Kitchen Hacks : घराच्या भिंतीवर पडलेले पेन-पेन्सिलचे डाग कसे साफ करावे? जाणून घ्या सोप्या ट्रिक्स

6,4,6,4,6,4…; सरफराज खानच्या वादळात पंजाबचा धुव्वा; अवघ्या 15 चेंडूत ठोकलं अर्धशतक

Eyebrow Makeup Tips: दाट आयब्रोजसाठी करा असा सोपा मेकअप, दिसेल एकदम फ्रेश नॅचरल लूक

Maharashtra Live News Update: सोलापूर महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्याचा प्रकाशन सोहळा

SCROLL FOR NEXT