MP Road Accident Saam Tv
देश विदेश

MP Road Accident : महाराष्ट्रात परतणाऱ्या मजुरांवर काळाचा घाला; बस-कारच्या धडकेत 11 जणांचा मृत्यू

कार चालकाला डुलकी लागली अन् कारवरील नियंत्रण सुटलं

Shivani Tichkule

Betul Road Accident : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) बैतूलमध्ये काल रात्री भीषण अपघात (Accident) झाला. बस आणि कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. तर मृतांमध्ये 5 पुरुष आणि 4 महिलांचा समावेश आहे. मृतांची अद्याप ओळख पटलेली नाही. गुडगाव ते भैसदेही दरम्यान हा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. (Betul Road Accident Latest Update)

मिळालेल्या माहितीनुसार, कारमधील सर्व जण अमरावतीहून (Amravati) आपापल्या घरी परतत होते. त्यावेळी कार चालकाला डुलकी लागली आणि कारवरील नियंत्रण सुटलं. त्यानंतर कार विरुद्ध दिशेनं येणाऱ्या बसला धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याशिवाय बसच्या पुढील भागाचेही नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच बैतूलचे जिल्हाधिकारी आणि एसपीसह अन्य अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झल्लार परिसरात बस आणि कार यांच्यात जोरदार धडक झाली आणि भीषण अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला. गाडीतील सर्व लोक मजूर आहेत, हे सर्वजण महाराष्ट्रातील कळंबा येथून आपल्या गावाकडं जात होते. महाराष्ट्रात काम करणारे हे मजूर दिवाळी आणि छठ पूजानिमित्त आपापल्या घरी गेले होते आणि आता सण संपवून घरी परतत होते. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. तर मृतांमध्ये 5 पुरुष आणि 4 महिलांचा समावेश आहे. मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ठाकरे गटाला मोठा धक्का, गुहागरमधील नेत्या शिवसेनेत प्रवेश करणार

Malshej Ghat Kalu Waterfall Tragedy : मुसळधार पावसामुळे नदीला अचानक पूर, ३०० पर्यटक अडकले; सुटकेचा थरार कॅमेऱ्यात कैद, VIDEO

Biscuits Side Effects: तुम्हालाही बिस्कीट खायला आवडतं? पण होतात 'हे' गंभीर परिणाम, एकदा वाचाच

Mansa Devi Temple: शॉर्ट सर्किटची अफवा; अरुंद पायऱ्या आणि फक्त एकच रस्ता, मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी ; थरकाप उडवणारा Video Viral

Rakshabandhan 2025: वास्तुशास्त्रानुसार, रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला 'या' भेटवस्तू देऊ नका

SCROLL FOR NEXT