Madhabi Puri Buch Saam Digital
देश विदेश

Madhabi Puri Buch : ‘सेबी’च्या अध्यक्षा माधबी पुरी बुच यांच्या अडचणीत वाढ, हिंडेनबर्गच्या आरोपांची होणार चौकशी

Sandeep Gawade

हिंडेनबर्गने ‘सेबी’च्या अध्यक्षा माधबी पुरी बुच यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. विरोधकांनी यावरून सरकारवर टीकेची झोड उठवली होती. त्यानंतर अखेर संसदेच्या लोकलेखा समितीने माधवी पुरी बुच यांना समन्स बजावले असून २४ ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सेबीचे अधिकारी आणि वित्त मंत्रालयाच्या काही अधिकाऱ्यांनाही हजर राहण्याचे निर्देश दिल्यामुळे माधबी पुरी बुच यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

हिंडेनबर्ग रिसर्चने काही दिवसांपूर्वी अदाणी ग्रुप आणि सेबीच्या प्रमुख माधवी बुच यांच्यामध्ये आर्थिक हितसंबंध असल्याचं म्हटलं होतं. अदानी समूहाविरोधात जवळपास दीड वर्षांपूर्वी हिंडेनबर्गने अनेक खुलासे करत मोठा धक्का दिला होता. त्यानंतर मात्र यावेळी हिंडेनबर्गने थेट बाजार नियंत्रक सेबीवर गंभीर केले होते.त्यामुळे भारतीय उद्योग क्षेत्रात खळबळ उडाली होती. हिंडेनबर्ग रिसर्चने यासंदर्भातील रिपोर्ट आपल्या अधिकृत साईटवर प्रसिद्ध केला होता.

मात्र माधवी पुरी बुच यांनी हिंडेनबर्गने केलेले सर्व आरोप फेटाळून लावले होते. माधवी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांनी यासंदर्भात एक संयुक्त निवेदन प्रसिद्ध केलं होतं. हिंडनबर्गच्या अहवालात नमूद केलेल्या निधीतील गुंतवणूक २०१५ मध्ये सिंगापूरमध्ये रहात असताना करण्यात आली होती. त्यानंतर २ वर्षापूर्वी माधबी पुरी बुच सेबीच्या पूर्णवेळ सदस्य होत्या, असं या निवेदनात त्यांनी म्हटलं होतं.

मात्र विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला होता. केंद्र सरकारवर या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. अखेर संसदीय लोकलेखा समितीने माधबी पुरी बुच यांना समन्स बजावले आहेत. लोकलेखा समिती केंद्र सरकारच्या खर्चांवर देखरेख ठेवण्याचं काम करते. काँग्रेसचे खासदार के.सी.वेणूगोपाल या समितीचे अध्यक्ष आहेत.२९ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत त्यांनी लेखाजोखा घेण्याचा निर्णय घेतला होता. सेबीचा लेखाजोखा घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून माधबी पुरी बुच यांना समन्स बजावण्यात आले आहेत.

काय होता आरोप?

सेबीच्या अध्यक्षांची ऑफशोअर संस्थांमध्ये हिस्सेदारी होती. एप्रिल 2017 ते मार्च 2022 पर्यंत माधबी पुरी बुच सेबीच्या पूर्णवेळ सदस्य आणि अध्यक्ष होत्या. Agora Partners या सिंगापूरमधील सल्लागार कंपनीत त्यांची 100 टक्के भागीदारी होती. 16 मार्च 2022 मध्ये सेबीच्या अध्यक्षा म्हणून त्यांची नियुक्ती होण्याआधी दोन आठवड्यांपूर्वी त्यांनी कंपनीतील शेअर्स त्यांचे पती धवल बुच यांच्या नावावर हस्तांतरित केले, असा धक्कादायक आरोप या अहवालात करण्यात आला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

National Park: प्राणी प्रेमींनो! भारतातील 'ही' राष्ट्रीय उद्याने पाहिलीत का?

Jammu Kashmir Exit Polls : जम्मू-काश्मीरमध्ये येणार 'इंडिया आघाडी'चं सरकार, भाजपला बसणार धक्का? जाणून घ्या EXIT POLL चा अंदाज

Marathi News Live Updates :हरियाणात १० वर्षांनंतर काँग्रेस रिटर्न, जम्मूत भाजपची सत्ता; एक्झिट पोलचे आकडे आले

Navratri 2024: देवीला दाखवा हा नैवेद्य; इच्छा होतील पूर्ण

Haryana Election Exit Poll : हरियाणात १० वर्षांनंतर काँग्रेसचं सरकार? भाजपची हॅट्ट्रिक हुकणार, जाणून घ्या Exit Poll चे अंदाज

SCROLL FOR NEXT