Congo news Saam Tv News
देश विदेश

Goma city violence: बंडखोरांच्या समूहाचं जगाला हादरवणारं कृत्य; शेकडो कैदी महिलांवर अत्याचार,अनेकांना जिवंत जाळलं

Women burned alive Congo: बंडखोरांनी मुंजेंजे तुरूंगात कैद असलेल्या १०० हून अधिक महिलांवर बलात्कार केला. त्यानंतर जिवंत जाळण्यात आलं. परिस्थिती अद्याप नियंत्रणात आलेली नसल्याची माहिती समोर आली आहे.

Bhagyashree Kamble

डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो या शहरातून खळबळजनक बातमी समोर येत आहे. १०० हून अधिक महिलांवर आधी बलात्कार करण्यात आले. नंतर त्या महिलांना जिवंत जाळण्यात आलंय. रवांडाचा पाठिंबा असलेल्या M23 बंडखोर संघटनेनं काँगोच्या गोमा शहरात प्रवेश केला, त्यानंतर हे कृत्य केलंय. या हल्ल्यावेळी काँगोमध्ये मोठ्या प्रमाणात मानवी हक्कांचे उल्लघंन झाल्याचं सांगितलं जात आहे.

संयुक्त राष्ट्रानं दिलेल्या रिपोर्टनुसार, बंडखोरांनी मुंजेंजे तुरूंगात कैद असलेल्या १०० हून अधिक महिलांवर बलात्कार केला. त्यानंतर त्यांना जिवंत जाळण्यात आलंय. परिस्थिती अद्याप नियंत्रणात आलेली नसल्याची माहिती समोर आली आहे.

जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात बंडखोरांनी डेमोक्रॅटिक ऑफ कांगोच्या गोमा शहरात प्रवेश करत ताबा मिळवला होता. तेव्हापासून तेथील नागरिकांविरोधात हिंसाचार सुरू आहे. या हिंसाचारात हजारो नागरीक मारले गेले. त्यांचे मृतदेह अद्याप दफन करण्यात आलेले नाही.

मुंजेंजे तुरंगातील महिला कैद्यांवर हल्ला करण्यात आलाय. त्यानंतर हजारो पुरूष तुरूंगातून पळून जाण्यात यशस्वी ठरलेत. ४ हजार कैदी तुरुंगातून पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. त्याच तुरूंगात काही महिला देखील होत्या. त्या महिलांवर लैंगिक अत्याचार केला. नंतर बंडखोरांनी महिला विंगला आग लावली. लावण्यात आलेल्या आगीत महिला जिवंत जळाल्या. यात महिलांचा मृत्यू झाला.

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये इमारतीमधून काळ्या धुराचे लोट बाहेर पडताना दिसत आहे. तसेच जोरदार गोळीबाराचाही आवाज येत आहे. या आगीत किमान १४१ कैदी आणि २८ मुले मृत्युमुखी पडले आहेत. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Sharma Viral Post: रोहित शर्मा मोठी घोषणा करणार; 'त्या' एका पोस्टने उडाली खळबळ, आभाळाऐवढी उत्सुकता

Horoscope: जीवनात येणार नवं प्रेम; ४ राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा; खर्चावर ठेवा नियंत्रण

मी अजितदादांसोबत बारामतीला जाणार, एअर होस्टेस पिंकी माळीचे वडिलांसोबतचे शेवटचे शब्द

अजित पवारांचा अपघात कसा झाला? ब्लॅक बॉक्स सापडला, गूढ उकलणार?

दादांचा पायलट दोन वेळा निलंबीत, 2 वेळा दारू पिऊन उडवलं विमान

SCROLL FOR NEXT