Crime Saam
देश विदेश

Crime: खोलीतून ओरडण्याचा आवाज, तरूणी अर्ध नग्न अवस्थेत आढळली; बॉयफ्रेंडने नेमकं काय केलं?

Girl Found Dead at Boyfriends Home: एका तरुणीचा मृतदेह तिच्या प्रियकराच्या घरी संशयास्पद परिस्थितीत सापडल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Bhagyashree Kamble

लखनऊ महानगरातून एक धक्कदायक बातमी समोर येत आहे. एका तरूणीचा मृतदेह तिच्या प्रियकराच्या घरी संशयास्पद स्थितीत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. मृत तरूणीच्या कुटुंबाने प्रियकरावर आरोप केला की, मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आहे. पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले असून, पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

मृत तरूणीच्या बहिणींने नेमकं काय म्हटलं?

ज्या दिवशी तरूणीची हत्या झाली, त्या दिवशी मृत तरूणी आपल्या बहिणीसोबत दुकानात उपस्थितीत होती. मृत तरूणीच्या बहिणीने सांगितलं की, 'आरोपी तरूण पवन बुधवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास दुकानात आला. तसेच बहिणीला घेऊन गेला. त्याने बहिणीला जबरदस्तीने त्याच्या भिखापूर येथील घरी घेऊन गेला. संशय आल्यानंतर मी त्याच्या घरी पोहोचली. मात्र,मुख्य दरवाजा उघडा होता आणि ग्रिल बंद होती. आतून ओरडण्याचा आवाज येत होता.

जेव्हा आत गेली, तेव्हा बहीण बेशुद्ध होऊन बेडवर पडलेली होती. पवनला तातडीने बहिणीला रूग्णालयात नेण्यास सांगितले होतं, पण त्याने ऐकले नाही. जेव्हा दबाव टाकला तेव्हा, दोघांना नदीच्या काठावर सोडून पळ काढला'. यानंतर पीडित तरूणीला रूग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

मृत तरूणीच्या वडिलांनी सांगितलं की, पवन आणि त्यांची मुलगी, कॉलेजमध्ये असल्यापासून मित्र होते. परंतू अलिकडच्या काळापासून त्यांच्या वाद सुरू होते. मृत तरूणीच्या वडिलांनी पवनवर संशय व्यक्त केला आहे. पवनने प्रथम मुलीवर बलात्कार केला नंतर तिची हत्या केली, असा आरोप मृत तरूणीच्या वडिलांनी केला. या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली असून, शवविच्छेदन अहवालाच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल, असं पोलिसांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जालन्यातील बदनापुर तालुक्यातील गेवराई बाजार परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस

Tesla Y Model Specification: टेस्लाचे सुपर फिचर्स आता भारतात, खास फिचर्स जाणून तुम्हीही व्हाल थक्क

सून बाथरूममध्ये आंघोळ करत होती, सासऱ्यानं मागून धरलं अन् बेडवर ढकललं; सासऱ्याचा खरा चेहरा समोर

CM Devendra Fadnavis: वरळी दहीहंडीतून फडणवीसांचा हल्ला; पापाची हंडी फुटली, विकासाची हंडी लागेल|VIDEO

Solapur News : एसीचा स्फोट आणि होत्याच नव्हतं झालं; सोलापुरात महिलेचा दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT