घराच्या गेटच्या रंगावरुन शेजाऱ्यांशी भांडण; त्या तरुणीचा जुना व्हिडीओ व्हायरल Saam Tv News
देश विदेश

घराच्या गेटच्या रंगावरुन शेजाऱ्यांशी भांडण; त्या तरुणीचा जुना व्हिडीओ व्हायरल

कॅब ड्रायव्हरला मारहाण करणाऱ्या लखनऊमधील तरुणीचा आणखी एक जुना व्हिडीओ व्हायरल झालाय. या व्हिडीओत ती शेजारच्यांशी भांडताना दिसत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लखनऊ : कॅब चालकाला भर रस्त्यात मारहाण करणाऱ्या लखनऊमधील तरुणीचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झालाय. हा व्हिडीओ जुना असून या व्हिडीओत ती तरुणी आपल्या शेजारच्यांशी भांडताना दिसत आहे. तिच्या शेजारच्यांनी त्यांच्या घराच्या गेटला काळा रंग दिला यावरुनच ही तरुणी त्यांच्याशी भांडत आहे. या व्हिडीओत तरुणीच्या भांडणामुळे आजूबाजूला गर्दी झाल्याचे दिसत आहे त्यामुळे पोलिसही याठिकाणी पोहोचले आहे. ते या तरुणीला समजवण्याचा प्रयत्न करत आहेत पण, ही तरुणी काहीही समजून घेण्याच्या मनःस्थितीत नसल्याचे दिसत आहे. (lucknow girl another video goes viral)

हे देखील पहा -

या भांडणाचे कारणही अजबच आहे. गेटच्या काळ्या रंगामुळे परिसरात आंतरराष्ट्रीय ड्रोन ईथे फिरतात असं या तरुणीचं म्हणणं आहे. त्यामुळे घराच्या गेटला काळा रंग देणं बरोबर आहे का? असा प्रश्न ही तरुणी विचारत आहे. तिच्या या प्रश्नामुळे आजूबाजूचे लोकही तिला हसत असल्याचे व्हिडीओत दिसत आहे. तिचा हा नवा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून ही तरुणी पुन्हा ट्रोल होत आहे.

लखनऊच्या या तरुणीचे नाव प्रियदर्शनी यादव असून तिने काही दिवसांपुर्वी एका कॅब चालकाला भर रस्त्यात मारहाण केली होती. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर प्रचंड व्हायरल झाला होता. अनेकांनी या तरुणीवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली होती. तर अनेकांनी तिला उद्धट आणि फेक फेमिनिस्टही म्हटले होते. आता पुन्हा समोर आलेल्या या व्हिडीओने तिची थट्टा होत असून ती चांगलीच ट्रोल होतेय.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dangerous Diet Foods : डायटिंग करताय ? हे ३ पदार्थ तुमच्या जीवावर बेतू शकतात.

Maharashtra Live News Update : बोलताना भान ठेवा, अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंचे कान टोचले

बसने स्कूटीस्वार तरुणीला चिरडले; घटनास्थळीच मृत्यू; सीसीटीव्ही व्हिडिओ आला समोर

Maharashtra Politics : निवडणूका जिंका, महामंडळ मिळवा! चंद्रशेखर बावनखुळे नेमके काय म्हणाले ? | VIDEO

ITR Filling 2025: आयकर विभागाचा मोठा निर्णय! आयटीआर रद्द झाला तरीही पुन्हा मिळणार संधी, खात्यात जमा होणार रिफंड

SCROLL FOR NEXT