विद्यार्थ्यांना दिलासा; मुंबई विद्यापीठाने केली शुल्ककपात

2021-22 साठी विविध कॅम्पस सेवांचे शुल्क आणि इतर शुल्क कमी करण्यात आले आहेत. जर, विद्यार्थ्याने कोविड -19 मुळे एक पालक किंवा दोन्ही पालक गमावले असतील तर त्यांच्या 100% शुल्क माफीची घोषणा विद्यापीठाने केली आहे.
विद्यार्थ्यांना दिलासा; मुंबई विद्यापीठाने केली शुल्ककपात
विद्यार्थ्यांना दिलासा; मुंबई विद्यापीठाने केली शुल्ककपातSaam tv
Published On

मुंबई: मुंबई विद्यापीठातील MU पदवीपूर्व महाविद्यालयामध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना सुमारे 1700 रुपयांचा फायदा होणार आहे. कारण 2021-22 साठी विविध कॅम्पस सेवांचे शुल्क आणि इतर शुल्क कमी करण्यात आले आहेत. जर, विद्यार्थ्याने कोविड -19 मुळे एक पालक किंवा दोन्ही पालक गमावले असतील तर त्यांच्या 100% शुल्क माफीची घोषणा विद्यापीठाने केली आहे.

हे देखील पहा-

जर एखादा विद्यार्थी उर्वरित फी एकत्र भरण्यास असमर्थ असेल, तर तो कॉलेजला लेखी अर्ज देऊन फी अर्धवट जमा करण्याची सुविधा मिळवू शकतो. कोरोना महामारीमुळे लोकांचा आर्थिक त्रास लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

हा निर्णय विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी घेण्यात आला आहे. मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत सर्व महाविद्यालयांचे शुल्क कापले जाईल. हा निर्णय केवळ शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी घेण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांना दिलासा; मुंबई विद्यापीठाने केली शुल्ककपात
Pornography Case: शर्लिन चोप्राला क्राईम ब्रँचचे समन्स, आज होणार चौकशी

जर अतिरिक्त अभ्यासक्रमांचे आयोजन केले तर तो 50 टक्के शुल्क आकारू शकतो. उपक्रमाचे आयोजन नाही झाले तर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. जर महाविद्यालयाने मासिक प्रकाशित केले तर विद्यार्थ्यांकडून 25% शुल्क आकारले जाऊ शकतात.

अशी होणार फीस कमी;

- लायब्ररी फीस : 50%

- प्रयोगशाळा फीस : 50%

- जिमखाना शुल्क: 50%

- एक्स्ट्रा करिकुलर ऐक्टिव्हीटी : 50%

- परीक्षा फीस : 25%

- इंडस्ट्रियल फीस : 100%

- मॅगझीन फीस : 100%

- स्टूडेंट वेलफेयर फंड : 100%

- डेव्हलपमेंट फंड: 25%

- लायब्ररी डिपॉझिट: 100%

- प्रयोगशाला डिपॉझिट : 100%

- अन्य डिपॉझिट : 100%

भविष्यात कोरोना Corona साथीची परिस्थिती सामान्य झाल्यास आणि विद्यार्थ्यांना शारीरिकदृष्ट्या महाविद्यालयांमध्ये उपस्थित राहण्याची परवानगी असल्यास, वसतिगृह शुल्कासह विविध भागातील फी घटक शुल्क पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्रपणे आकारले जाऊ शकतात या निर्णयाचे परिपत्रक मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये स्पष्ट केले आहे.

महाड, चिपळूण आणि इतर भागातील पुराच्या वेळी ज्या विद्यार्थ्यांनी हे गमावले असतील त्यांना मोफत मार्कशीट, दीक्षांत प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रे देण्याचा निर्णय एमयूने घेतला आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com