Lucknow Crime news Saam Tv
देश विदेश

मेडिकल स्टूडेंट गर्लफ्रेंडसोबत OYOमध्ये गेला, गोळ्या खाल्ल्या अन्.. संशयास्पद मृत्यूमागचं गूढ वाढलं

Crime news: ओयो हॉटेलमध्ये एका मेडिकल विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. तरूणासोबत गर्लफ्रेंड देखील होती. गोळ्या खाल्ल्यानंतर मृत्यू झाल्याची माहिती.

Bhagyashree Kamble

लखनऊच्या मडियाव केशव नगरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ओयो हॉटेलमध्ये एका मेडिकल विद्यार्थ्याचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळला आहे. तरूण गर्लफ्रेंडसोबत हॉटेलमध्ये गेला होता. त्यानं काही गोळ्या खाल्ल्या. या गोळ्यांमुळे त्याची तब्येत बिघ़डली. काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. हॉटेलमध्ये तरूणाचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळल्यामुळे पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तपासाला सुरूवात केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फुजैल अहमद(वय वर्ष २८) असं तरूणाचे नाव आहे. त्यानं चीनमधून एमबीबीएस डिग्री पूर्ण केली होती. तो नंतर भारतात परतला. भारतात राहून तो एमसीआई परिक्षेची तयारी करत होता. मात्र, शुक्रवारी ही घटना उघडकीस आली. कुटुंबाने तरूणासोबत असलेल्या तरूणीची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

तरूणीची लवकरच चौकशी केली जाईल, असं पोलिसांनी सांगितलं. फुजैलने ओयोमध्ये जाण्यापूर्वी मालकाला दोघे कपल असल्याचं सांगितलं. लवकरच लग्न होणार आहे, असंही सांगितलं. पण मेडिकल स्टूडेंट असूनही फुजैलनं अशा कोणत्या गोळ्या खाल्ल्या, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला, या गोष्टी संशयास्पद आहेत. याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवले. पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आल्यानंतर तरूणाच्या मृत्यूमागचं खरं कारण समोर येईल. सध्या पोलिसांनी ओयो हॉटेल आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त केले आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News : ऐन दिवाळीत पुणे महापालिकेत खळबळ; दोन बड्या सरकारी अधिकाऱ्यांचं निलंबन

Govardhan Asrani Dies: प्रसिद्ध विनोदी अभिनेते असरानी यांचा जगाला अलविदा, मृत्यूपूर्वीची शेवटची पोस्ट व्हायरल

Maharashtra Live News Update: झेंडूच्या फुलांना मिळाला अवघा 5 ते 10 रुपये प्रतिकिलो दर

Asrani Death: प्रसिद्ध विनोदी अभिनेते असरानी यांचे निधन, वयाच्या ८४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Maharashtra Officers Promotion : राज्यात सनदी अधिकाऱ्यांना दिवाळी भेट; नरक चतुर्दशीच्या दिवशी कुणाची कुठे बढती झाली? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT