Ashish Mishra  Twitter/@ANI
देश विदेश

Lakhimpur Violence: शेतकऱ्यांना चिरडल्याचा आरोप असलेल्या मंत्रीच्या पुत्राला जामीन मंजूर

लखीमपूर हिंसाचार प्रकरणी गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याला उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे. उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने आशिष मिश्रा यांना जामीन मंजूर केला आहे.

वृत्तसंस्था

लखीमपूर खेरी (Lakhimpur Violence Case) येथे शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडल्याच्या कथित आरोपांमुळे तुरुंगात असलेल्या केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा (Ajay Mishra) यांचा मुलगा आशिष मिश्रा (Ashish Mishra) याला उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौच्या खंडपीठाने आशिष मिश्राला जामीन (Bail) मंजूर केला आहे. उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर आशिष मिश्रा उद्या म्हणजेच 11 फेब्रुवारीला तुरुंगातून बाहेर येईल.

उत्तर प्रदेश एसआयटीने नुकतेच लखीमपूर हिंसाचार प्रकरणी आरोपपत्र दाखल केले होते. 5000 पानांच्या आरोपपत्रात SIT ने केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याला मुख्य आरोपी म्हणून आरोप केले होते. एवढेच नाही तर एसआयटीच्या म्हणण्यानुसार आशिष घटनास्थळी देखील उपस्थित होता.

208 जणांनी साक्ष दिली;

तपासात, एसआयटीला 17 वैज्ञानिक पुरावे, सात भौतिक पुरावे आणि 24 व्हिडिओ फोटो सापडले होते ज्यामुळे आरोपींच्या अडचणी वाढल्या होत्या. याशिवाय 208 जणांनी साक्ष दिली होती. या आधारे एसआयटीने आरोपपत्र लिहून ठेवले आहे. मंत्र्यांचा मुलगा आशिष घटनास्थळी उपस्थित असल्याचे साक्षीदारांनी एसआयटीला सांगितले होते. शेतकऱ्यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे आशिष मिश्रा आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न अशा अनेक गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लखीमपूर खेरी हिंसाचारात एका वृत्तवाहिनीचे रिपोर्टर रमन कश्यप यांचा मृत्यू झाला होता. त्याने चार शेतकऱ्यांना आपल्या कारने तुडवले आणि त्यात चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. यानंतर या कृत्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी अनेक वाहने पेटवून दिली आणि चार जणांना बेदम मारहाण केली होती. ज्यामध्ये रमण कश्यपचाही सहभाग होता. एका चालकासह दोन भाजप कार्यकर्त्यांनाही शेतकऱ्यांनी बेदम मारहाण केली होती. त्याचवेळी या प्रकरणाची कार्यवाही न्यायालयात सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री अजित पवार अहिल्यानगरमध्ये दाखल

Pune Rave Party: आधी हॉटेलची रेकी, नंतर आखला एकनाथ खडसेंच्या जावयाला अडविण्याचा डाव; खेवलकरांच्या वकिलांचा धक्कादायक खुलासा

Beed Shocking : बीडमध्ये आणखी एक वैष्णवी जीवाला मुकली, सासरच्या छळाला कंटाळून २० वर्षीय विवाहितेने आयुष्य संपवलं

Rave Vs Party : पार्टी आणि रेव्हमध्ये काय फरक आहे?

Parenting Tips: मुलांना आपले मित्र बनवायचंय? तर फॉलो करा 'या' टिप्स

SCROLL FOR NEXT