LPG Gas Connection Saam Tv
देश विदेश

LPG Price : खुशखबर! सिलेंडरच्या दरात मोठी कपात; जाणून घ्या नवे दर

ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीलाच ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. एलपीजी गॅस सिलेंडरचे नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत.

साम टिव्ही ब्युरो

LPG Gas Cylinder : ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीलाच ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. एलपीजी गॅस सिलेंडरचे (Gas Cylinder) नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार, व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या (LPG Price) दरात 32.50 रुपयांची कपात करण्यात आली आहे. मात्र, घरगुती एलपीजी सिलेंडर ग्राहकांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. (LPG Gas Cylinder Latest Price)

14.2 किलोचा घरगुती सिलेंडर स्वस्त किंवा महागही झाला नाही. घरगुती सिलेंडर आहे त्याच दराने उपलब्ध आहे. व्यावसायिक सिलेंडरच्या दरात सलग सहाव्या महिन्यात घट झाली आहे. दरम्यान, नैसर्गिक वायूच्या दरात 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

आजपासून 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत कमी झाली आहे. व्यावसायिक सिलेंडरच्या दरात मुंबईमध्ये 32.50 रुपये, दिल्लीमध्ये 25.50 रुपये, कोलकातामध्ये 36.5 रुपये तर चेन्नईमध्ये 35.5 रुपयांनी कमी झाले आहेत. यामुळे मुंबईमध्ये आता व्यावसायिक सिलेंडरचा दर 1811.50 रुपये किमतीला मिळेल. (Gas Cylinder News Today)

नैसर्गिक वायूच्या दरात 40 टक्क्यांनी वाढ

दरम्यान, महिन्याच्या सुरूवातीलाच नैसर्गिक वायूच्या किंमतीत मोठी वाढ झाली जागतिक बाजारात शुक्रवारी नैसर्गिक वायूच्या किमती 40 टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यामुळे वीजनिर्मिती, खतनिर्मिती आणि वाहने चालवण्यासाठी वापरण्यात येणारा गॅस महाग होण्याची शक्यता आहे. वायू क्षेत्रातून तयार होणाऱ्या गॅससाठी द्यावा लागणारा दर 8.57 प्रति दशलक्ष डॉलरपर्यंत वाढवण्यात आला आहे. हा दर आधी 6.1 प्रति दशलक्ष डॉलर ब्रिटिश थर्मल युनिट इतका होता.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूर दौऱ्यावर

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT