Cylinder Price Hike Saam Tv
देश विदेश

मोठी बातमी! घरगुती LPG सिलेंडरच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या नवीन दर

घरगुती LPG सिलेंडरचे हे वाढीव दर आजपासून लागू होणार आहे.

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - घरगुती एलपीजी सिलिंडरच्या (LPG Cylinder) किंमती पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहेत. घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. हे नवीन दर आजपासून लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे आता दिल्लीत घरगुती एलपीजी सिलिंडर 1053 रुपयांना मिळणार आहे. यासोबतच 5 किलोच्या घरगुती सिलिंडरच्या दरातही 18 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

दुसरीकडे 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. त्याची किंमत प्रति सिलेंडर 8.50 रुपयांनी कमी झाली आहे. त्यामुळे व्यावसायिकांना काहीसा दिलास मिळाला आहे.

काही दिवसांपूर्वी व्यावसायिक सिलिंडरच्या किंमती 198 रुपयांनी कमी झाल्यामुळे व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला होता. त्यानंतर आज पुन्हा 8.50 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. नव्या दरांच्या घोषणेनंतर आता राजधानी दिल्लीमध्ये 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत 2,012 रुपये मोजावे लागणार आहे. त्यापूर्वी दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत 2021 रुपयांवर गेली होती.

तुमच्या शहरातील घरगुती सिलिंडरचे दर जाणून घ्या

दिल्ली: 1053

मुंबई: 1053

कोलकाता: 1079

चेन्नई: 1069

लखनऊ: 1091

जयपुर: 1057

पटना: 1143

इंदौर: 1081

अहमदाबाद: 1060

पुणे: 1056

गोरखपुर: 1062

भोपाल: 1059

आगरा: 1066

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे व मुंडे कुटुंबियांची परळीत रोहित पवार घेणार भेट

Chanakya Niti : बायको तुमच्यावर खरंच प्रेम करते की नाही कसं ओळखाल?

Cheesy Noodles Recipe : ऑफिसवरून घरी आल्यावर भूक लागलीय? ५ मिनिटांत बनवा चीजी नूडल्स

Traffic Rule: भावा,वारंवार चालान येणं चांगलं नव्हं! ड्रायव्हिंग लायसन्स होईल रद्द; जाणून घ्या नवीन नियम

Pune Shocking : पुणे हादरलं! आयटी इंजिनीअर तरुणाने कंपनीतच आयुष्य संपवलं, हिंजवडी आयटी पार्कात खळबळ

SCROLL FOR NEXT