नवी दिल्ली - दिवाळीच्या तोंडावरच 'महागाईचा बॉम्ब' फुटला आहे कारण एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात 265 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. ही वाढ केवळ व्यावसायिक सिलिंडरमध्येच झाली आहे. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेले नाही.
हे देखील पहा -
दिल्लीत व्यावसायिक सिलिंडर आधी 1733 रुपये होता तो आता 2000 रुपयांच्या पुढे गेला आहे. तर मुंबईमध्ये 1683 रुपयांना मिळणारा सिलिंडर आता 1950 रुपयांना मिळणार आहे. तसेच, चेन्नईमध्ये आता सिलिंडरची किंमत 2133 रुपये आणि कोलकातामध्ये सिलिंडर 2073.50 रुपये झाला आहे.
दरम्यान, घरगुती वापरासाठीच्या 14.2 किलो विनाअनुदानित एलपीजी सिलिंडरच्या किमतीत पेट्रोलियम कंपन्यांनी वाढ केलेली नाही. त्याच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेले नाही. त्यामुळे दिल्लीमध्ये 14.2 किलोच्या विनाअनुदानित एलपीजी सिलिंडरची किंमत 899.50 रुपयांवर कायम आहे. गेल्या महिन्यात14.2 किलोच्या सिलेंडरची किंमत 15 रुपयांनी वाढवली होती.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.