New LPG booking rules and OTP-based delivery system likely to be implemented across India from May 2026. saam tv
देश विदेश

LPG Cylinder Booking Rules: १ मे पासून एलपीजी बुकिंगचे नियम बदलणार, सिलिंडर डिलीव्हरीतही बदल होणार?

LPG Supply Update: शहरांमध्ये गॅस सिलेंडर बुकिंगमधील अंतर २५ दिवसांपर्यंत आणि गावांमध्ये ४५ दिवसांपर्यंत वाढवण्यात आले आहे. तसेच ओटीपी-आधारित वितरण प्रणाली कायमस्वरूपी करण्याची तयारी सुरू आहे.

Bharat Jadhav

  • १ मे २०२६ पासून एलपीजी बुकिंग नियमांमध्ये बदल शक्य

  • शहरात २५ दिवस, गावात ४५ दिवस बुकिंग अंतर लागू

  • OTP आधारित डिलिव्हरी प्रणाली कायमस्वरूपी करण्याची तयारी

अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील युद्धाचा संपूर्ण जगावर मोठा परिणाम झाला. जगााल ऊर्जा संकटाचा सामना करावा लागला होता. भारताही इंधन पुरवठ्यावरही परिणाम झाला होता. भारतात एलपीजीची टंचाई झाली. या इंधन टंचाईपासून बचाव करण्यासाठी भारत सरकार काही नियम आणि निर्बंध आणली होती. तेल विपणन कंपन्या १ मे २०२६ पासून काही महत्त्वाचे नियम लागू करणार आहे.

यातच मे महिन्यापासून एलपीजी (LPG) सिलिंडर बुकिंगच्या नियमांमध्येही मोठ्या बदलांची चर्चा सुरू आहे. पुरवठा सुरळीत आणि सुनिश्चित करण्यासाठी सरकार आणि तेल कंपन्या बुकिंग आणि वितरण प्रणालीमध्ये सातत्याने बदल केले जात आहेत.

किंमतीतील बदल

गेल्या काही दिवसांत एलपीजी सिलिंडर महाग झाले आहेत. १४.२ किलोच्या घरगुती सिलिंडरच्या दरात ६० रुपयांनी वाढ झाली आहे. १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात एका महिन्यात तीनवेळा वाढ झाली आहे. १ मे २०२६ पासून किमती पुन्हा बदलू शकतात. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम यांसारख्या कंपन्या या संदर्भात नवीन नियम लागू करण्याबाबत विचार करत आहे.

बुकिंगचे नियम बदलू शकतात

बुकिंगचे नियमही अधिक कडक झाले आहेत. शहरांमध्ये गॅस सिलिंडर बुक करण्यामधील कालावधी २१ दिवसांवरून २५ दिवसांपर्यंत वाढवण्यात आला आहे. तर ग्रामीण भागात तो ४५ दिवसांपर्यंत वाढवण्यात आला आहे. यासह ओटीपी आधारित वितरण प्रणाली लागू करण्यात आली आहे. यामुळे ग्राहकांना गॅस वितरणाच्या वेळी ओटीपी देणे आवश्यक आहे. ही प्रणाली कायमस्वरूपी करण्याची तयारी सुरू आहे, जेणेकरून अनुदानित सिलिंडरच्या काळाबाजाराला आळा बसेल.

आधार eKYC

सरकारने आधार eKYC बाबतचे नियमही स्पष्ट केले आहेत. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आधार-आधारित पडताळणी अनिवार्य आहे. ज्यांनी आधीच ई-केवायसी पूर्ण केले आहे, त्यांना ही प्रक्रिया पुन्हा करण्याची आवश्यकता नाही. अनुदान लाभ मिळवणे सुरू ठेवण्यासाठी पीएमयूवाय (PMUY) ग्राहकांनी वर्षातून एकदा ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे.

PNG वापरण्यावर भर

सरकार आता लोकांना हळूहळू एलपीजीवरून पाईपद्वारे नैसर्गिक वायू म्हणजेच PNG वापरण्यास प्रोत्साहित करत आहे. ज्या भागांमध्ये PNG उपलब्ध आहे, तेथे जर ग्राहकांनी तीन महिन्यांच्या आत PNG चा वापर सुरू केला नाही त्यांचे एलपीजी कनेक्शन बंद केलं जाण्याची शक्यता आहे. यासह पीएनजी वापरणाऱ्या लोकांना नवीन एलपीजी कनेक्शन घेता येत येणार नाहीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पोपट आता पाळीव नाही तर ‘वन्यजीव, 10 वर्षांच्या लढाईनंतर शेतकऱ्याला न्याय

अपात्र लाडकींचा आकडा 26 लाख? बोगस लाभार्थ्यांकडून 165 कोटी वसूल करणार, 30 एप्रिलपर्यंत ई-केवायसीची मुदत

Dombivli Crime: संतापजनक! मदतीसाठी बोलावलेल्या मित्राकडूनच अनाथ तरुणीवर अत्याचार

भोंदू मनोहर भोसलेला राजकीय आश्रय? भोसलेच्या वाढदिवसाला 90 आमदारांची हजेरी?

Pune Crime : पुण्यातील खेडमध्ये गुंडांच्या टोळीचा धुडगूस, नागरिकांवर हल्ला, एकाला कारच्या बोनेटवरून फरफटत नेले, VIDEO

SCROLL FOR NEXT