Supreme Court Comment On Divorce
Supreme Court Comment On Divorce Saam TV
देश विदेश

Supreme Court On Divorce: प्रेमविवाहामुळे घटस्फोट वाढले, सुप्रीम कोर्टाची महत्वपूर्ण टिप्पणी

Ruchika Jadhav

Supreme Court: देशात घटस्फोटांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. घटस्फोटाचे प्रमाण वाढण्यामागचे मुख्य कारण म्हणजे प्रेम विवाह आहे, असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं आहे. (Latest Divorce News)

सुप्रीम कोर्टानं प्रेमविवाहासंबंधी एक महत्वपूर्ण टिप्पणी केली आहे. एका घटस्फोट प्रकरणात बुधवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. घटस्फोट होण्याचे प्रमाण वाढले असून, बऱ्याचशा प्रकरणांत प्रेमविवाह हे मुख्य कारण आहे, अशी टिप्पणी कोर्टानं केली आहे.

न्यायमूर्ती बी. आर. गवई, न्या. संजय करोल यांच्या खंडपीठासमोर वैवाहिक वादाशी संबंधित प्रकरण वर्ग करण्याच्या मुद्द्यावर सुनावणी घेण्यात आली. त्याचवेळी संबंधितांचा प्रेमविवाह झाल्याचे याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. त्यावेळी कोर्टाने घटस्फोटाची अनेक प्रकरणे प्रेमविवाहामुळे झाल्याचे समोर आले आहे, असे निरीक्षण नोंदवले.

सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेत पती पत्नीला मध्यस्ती करून विषय थांबवण्यास सांगितले. मात्र पती पत्नी दोघांनीही यासाठी नकार दिला आहे. न्यायमूर्ती एस के कौल यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधिशांच्या घटनापीठाने म्हटले की, विवाह म्हणजे समाधान आणि निस्वार्थ प्रेम असं नातं आहे.

कोर्टाने पुढे म्हटले आहे की, घटस्फोट देताना सर्व बाजूंनी विचार करावा लागतो. यामध्ये पती पत्नी दोघेही शेवटचे एकमेकांच्या सहवासात केव्हा आले होते, त्यांचा एकत्र राहण्याचा कालावधी त्यांनी पूर्ण केला आहे की नाही. आपल्या पार्टनर विषयी आणि एकमेकांच्या कुटुंबियांविषयी त्यांनी काय आरोप केलेत हे पहावे लागते.

सुप्रीम कोर्टाने या याचिकेवर केलेल्या या टिप्पणीमुळे प्रेम विवाहावर प्रश्न उपस्थित होतोय. आजकाल अनेक तरुण मुलं मुली एकमेकांच्या प्रेमात पडतात. आपल्याला पुढे एकमेकांची साथ देता येईल की नाही याचा ते फार विचार करत नाहीत. परिणामी पुढे जाऊन त्यांचे विचार पटत नाहीत आणि ते वेगळे होतात. अशी प्रकरणे सातत्याने समोर येत असल्याने सर्वोच्च न्यायालयाने असं निरीक्षण नोंदवलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cibil Score: कमी झालेला सिबिल स्कोअर ७०० पार कसा कराल? 'या' टिप्स सुधारतील तुमचा स्कोअर

Ankita Lokhande: हृदयस्पर्शी कॅप्शनसह अंकिता लोखंडेने पतीसोबतचा रुग्णालयातील फोटो केला शेअर

Maharashatra Elction: कोकणात ठाकरे विरुद्ध ठाकरे लढाई; उद्धव आणि राज ठाकरेंच्या सभांचा झंजावात

Petrol वर नाही CNG वर धावणार Bajaj ची नविन बाईक, Platina पेक्षा देणार जास्त मायलेज

Poco X6 5G नविन अवतारात लॉन्च झाला, मिळणार जबरदस्त फीचर्स

SCROLL FOR NEXT