Girlfriend - Boyfriend : प्रेम आंधळं असतं, असं फक्त म्हणायचे. पण खरंच प्रेम आंधळं असतं हे बिहारमध्ये अलीकडे उघडकीस आलेल्या प्रेमप्रकरणांच्या घटनांवरून लक्षात येतं. बेतियामध्ये अशीच एक अजब प्रेमाची गजब कहाणी समोर आली आहे. बॉयफ्रेंडला भेटता यावं म्हणून तरुणी अख्ख्या गावाची वीज गायब करायची.
बिहारमध्ये अलीकडच्या काळात अनेक प्रेमप्रकरणं उघडकीस आली आहेत. काही दिवसांपूर्वीच एक तरुणी सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणाला भेटली. प्रेमात आकंठ बुडाली. दोघेही पसार झाले. तरुणाच्या खिशात काही पैसे होते. ते संपल्यानंतर दोघांमध्येही ब्रेकअप झाला. खगडियामध्ये दोन मुलांची आई तीन मुलांच्या बापासोबत पळून गेली. त्यानंतर महिलेच्या पतीने त्या व्यक्तीच्या पत्नीसोबत लग्न केलं होतं.
बेतियामध्येही एक लव्ह स्टोरी समोर आली आहे. नौतन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात तरुणीचा प्रेमप्रताप उघड झाला आहे. बॉयफ्रेंडला भेटता यावं म्हणून ती संपूर्ण गावाचा वीजपुरवठा खंडित करायची. १४ जुलैलाही तिचा बॉयफ्रेंड भेटायला आला होता. त्यावेळीही तिने अख्ख्या गावची वीज कापली. (Latest Marathi News)
तिचा बॉयफ्रेंड भेटण्यासाठी गावात आला. त्यावेळी गावकऱ्यांनी त्याला पकडले. त्यानंतर एका बागेत नेऊन धुतले. बॉयफ्रेंडला मारहाण होत असल्याचे पाहून ती तरूणी सर्व गावकऱ्यांसोबत भिडली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बॉयफ्रेंडला वाचवण्यासाठी गावकऱ्यांशी 'पंगा' घेताना तरूणी या व्हिडिओत दिसते.
गावात काळोख पसरायचा, चोरीच्या घटनाही वाढल्या
गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ही तरूणी संपूर्ण गावचा वीजपुरवठा खंडित करायची. अंधारात तिचा बॉयफ्रेंड भेटण्यासाठी जायचा. दुसरीकडे वीज गुल झाल्यानंतर गावात चोरीच्या घटनांमध्येही वाढ झाली होती. गावातल्या अनेकांच्या मोटरसायकल, धान्य, अन्य वस्तू चोरीला जायच्या. त्यामुळे त्रासलेले गावकरी जागता पहारा द्यायचे. पहारा देत असतानाच या दोघांना गावकऱ्यांनी रंगेहाथ पकडले. तर त्या तरुणाला मारहाण केली.
मारहाणीचा बदला घेण्यासाठी आपल्या काही मित्रांना घेऊन गावात गेला. याबाबत गावकऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी त्या तरुणासोबत तिघा तरुणांना ताब्यात घेतले. तसेच तरूण आणि तरुणीकडील नातेवाइक पोलीस ठाण्यात पोहोचले. दोघांचेही लग्न लावून देण्याची दोन्ही पक्षकारांनी तयारी दर्शवली. त्यानंतर पोलिसांनी तरुणीच्या बॉयफ्रेंडचीही सुटका केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.