Ujjain DJ News
Ujjain DJ News Saam TV
देश विदेश

मित्राच्या वरातीत नाचताना तरुणाचा अचानक मृत्यू; कारण ऐकूण डॉक्टरही हैराण

साम टिव्ही ब्युरो

उज्जैन : मध्य प्रदेशातील उज्जैन (Ujjain) शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाच्या वरातीत डीजेवर (DJ Music) नाचताना तरुणाचा अचानक मृत्यू झाला. मित्राच्या लग्नाच्या वरातीत हा तरुण डीजेच्या मोठ्या आवाजावर नाचत होता. अचानक नाचता-नाचता तो खाली पडला आणि त्यानंतर पुन्हा उठलाच नाही. डीजेच्या मोठ्या आवाजामुळे त्याला हृदयविकाराचा झटका (Heart Attack आल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. या घटनेनंतर पानवासा पोलिसांनी मृतदेह आपल्या ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू केला आहे.

लाल सिंग (वय १८) असं मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचं नाव आहे. लाल सिंग हा उज्जैनजवळील अंबोडिया धरणावरचा रहिवासी आहे. शनिवारी तो आपला मित्र विजय याच्या लग्नात सहभागी होण्यासाठी ताजपूरला आला होता. लग्नात सहभागी झाल्यानंतर नवरदेवाची वरात निघाली होती. या वरातीत डीजे लावण्यात आला होता. डीजेच्या तालावर नाचत असताना लालसिंग हा व्हिडिओ देखील बनवत होता. यादरम्यान तो अचानक बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळला. त्यानंतर वऱ्हाडी मंडळीतील काही लोकांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी लालसिंगला मृत घोषित केलं.

डीजेच्या मोठ्या आवाजामुळे लालसिंग याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला अशी माहिती डॉक्टरांनी दिली. डॉक्टरांनी लालसिंगच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले असता, डीजेच्या मोठ्या आवाजामुळे त्याच्या हृदयात रक्ताची गुठळी जमा झाल्याचे अहवालातून समोर आले. डॉक्टरांनी सांगितले की, वरातीत किंवा मिरवणुकीत डीजे किंवा इतर मोठ्या साउंड सिस्टीममधून मोठ्या आवाजात गाणी वाजवली जातात. त्यामुळे तेथे उपस्थित असलेल्या लोकांच्या शरीरात असामान्य हालचाली होतात. निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त डेसिबल असलेला आवाज मानवी शरीरासाठी हानिकारक आहे. त्याचा परिणाम हृदय आणि मन या दोन्हींवर होऊ शकतो.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today : तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय? वाचा आजचे संपूर्ण राशिभविष्य

Maharashtra Election: भाजप-मनसेच्या युतीत शिवसेनेचा खोडा; बाळा नांदगावकरांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics 2024 : मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढली?; निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद

Maharashtra Politics 2024 : आमदार म्हणताहेत, ''खासदार' झाल्यासारखं वाटतंय'; महाराष्ट्रात 13 आमदार लोकसभेच्या रिंगणात

Health Tips: उन्हाळ्यात माठातील पाणी का प्यावे?

SCROLL FOR NEXT