Lok Sabha Speaker Election Saam Tv
देश विदेश

Lok Sabha Speaker Election: लोकसभा अध्यक्षपदासाठी 26 जून रोजी होणार निवडणूक, 3 जुलैपर्यंत चालणार संसदेचे अधिवेशन

Parliament Session 2024: येत्या 24 तारखेपासून संसदेचे अधिवेशन सुरु होणार आहे. या अधिवेशनात लोकसभेच्या नवीन अध्यक्षांची निवड होणार आहे.

Satish Kengar

अठराव्या लोकसभेचे कामकाज 24 जून रोजी सुरु होणार आहे. लोकसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर दोन दिवसांनी म्हणजेच 26 जून रोजी संसदेच्या नवीन अध्यक्षांची निवडणूक होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभेचे पावसाळी अधिवेशन 24 जून रोजी सुरु होईल आणि 3 जुलै रोजी संपेल.

लोकसभेच्या आगामी अधिवेशनात सर्व निवडून आलेले खासदारही शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 27 जून रोजी लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील आणि पुढील पाच वर्षांसाठी नवीन सरकारचा रोडमॅपबद्दल माहिती देतील.

याआधी संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी बुधवारी सांगितले होते की, 18 व्या लोकसभेचे पहिले सत्र 24 जूनपासून सुरू होईल. ज्यामध्ये नवनिर्वाचित संसद सदस्य शपथ घेतील आणि खालच्या सभागृहाच्या नवीन अध्यक्षांची निवड केली जाईल. अधिवेशनाच्या पहिल्या तीन दिवसांत नवनिर्वाचित सदस्य शपथ घेतील आणि लोकसभा अध्यक्षांची निवड केली जाईल.

लोकसभेच्या अध्यक्षांची निवड सामान्यत: लोकसभेच्या सदस्यांच्या पहिल्या बैठकीत केली जाते. सभापती निवड होण्याआधी एका खासदाराची प्रो-टेम अध्यक्षपदी (मर्यादित कालावधीसाठी) निवड केली जाते. प्रो-टेम अध्यक्ष नवीन खासदारांना शपथ देतात. तसेच नवीन अध्यक्षांची निवड प्रक्रिया त्यांच्या देखरेखीखाली होते.

दरम्यान, संसदेच्या दोन्ही सभागृहांची पुढील बैठक जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात बोलावली जाऊ शकते. ज्यामध्ये केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाईल. यासह निर्मला सीतारामन या सलग सात केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणाऱ्या पहिल्या अर्थमंत्री ठरणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मध्य रेल्वे सेवा विस्कळीत

Wednesday Horoscope : 6 राशींची होणार चांदी, काहींना डोकं शांत ठेवण्याची गरज; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Metro 13 Update : मुंबई मेट्रो आता वसई-विरारपर्यंत धावणार; १७,७२४.९९ कोटी खर्च, २५.०३ किमी लांबी, १६ स्थानके, प्रवासाचा वेळ अर्ध्यावर

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात वाढ, फडणवीस सरकारचा निर्णय; या तारखेपासून लागू

Pune Waterfall : जंगलाच्या कुशीत लपलेला सुंदर धबधबा! पुण्यापासून अवघ्या काही अंतरावर वसलंय 'हे' ठिकाण

SCROLL FOR NEXT