Unparliamentary Words Ban Loksabha News Update SAAM TV
देश विदेश

unparliamentary words Ban : जुमलाजीवी, शकुनी, लॉलीपॉप या 'असंसदीय' शब्दांच्या वापरास संसदेत बंदी; राजकारण तापलं

लोकसभा सचिवालयाने काही असंसदीय शब्दांची यादी प्रसिद्ध केली आहे.

ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही

नवी दिल्ली: संसदेचे पावसाळी अधिवेशन पुढील आठवड्यापासून सुरू होत आहे. हे अधिवेशन सुरू होण्याआधी लोकसभा सचिवालयाने काही असंसदीय शब्दांची यादी प्रसिद्ध केली आहे. ते शब्द लोकसभा आणि राज्यसभेच्या सभागृहात वापरण्यास मनाई आहे. या यादीत काही कॉमन शब्दही आहेत, त्यांचा वापर दैनंदिन व्यवहारातही केला जातो. मात्र, अशा शब्दांचा वापर हा असंसदीय मानला जाईल. (Unparliamentary Words Ban in Loksabha News Update)

काँग्रेसने (Congress) 'जुमलाजीवी' आणि अन्य काही शब्दांचा 'असंसदीय अभिव्यक्ती'च्या श्रेणीत समावेश केल्याने सरकारवर निशाणा साधला आहे. सरकारचे सत्य उघड करण्यासाठी विरोधकांकडून वापरले जाणारे सर्व शब्द आता 'असंसदीय' मानले जातील, अशा शब्दांत काँग्रेसने टीका केली आहे.

काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी ट्विट केले आहे. 'मोदी सरकारचे (Modi Government) सत्य उघड करण्यासाठी विरोधकांकडून वापरले जाणारे सर्व शब्द आता 'असंसदीय' मानले जातील. आता पुढे काय?, ' असे रमेश यांनी म्हटले आहे. काँग्रेसचे खासदार अभिषेक मनु सिंघवी यांनीही ट्विट केले आहे. 'शब्दांवर बंदी घालणे योग्य नाही,' असे ते म्हणाले.

दरम्यान, संसदेचे पावसाळी अधिवेशन (Parliament) १८ जुलैपासून सुरू होत आहे. या अधिवेशनात हा नियम लागू होणार आहे. लोकसभा सचिवालयाने एक बुकलेट प्रसिद्ध केले आहे. त्यात 'जुमलाजीवी', बालबुद्धी, कोविड स्प्रेडर, स्नुपगेट सारख्या शब्दांना लोकसभा आणि राज्यसभेच्या कामकाजावेळी असंसदीय मानले जाईल.

यात काही इंग्रजी आणि वाक्यांच्या वापरालाही बंदी घालण्यात आली आहे. त्यात आय विल कर्स यू, बिटेन विद शू, बिट्रेड, ब्लडशेड, चिटेड, शेडिंग क्रोकोडाइल टिअर्स, डंकी, गुन्स, माफिया, रबिश, स्नेक चार्मर, टाउट, ट्रेटर, विच डॉक्टर आदी शब्द आणि वाक्यांचा समावेश आहे.

संसदेच्या लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सदनांच्या कामकाजादरम्यान सदस्य आता चर्चेत सहभागी होताना, जुमलाजीवी, बालबुद्धी सांसद, शकुनी, जयचंद, लॉलीपॉप, चांडाल चौकडी, गुल खिलाए, पिठ्ठू यांसारख्या शब्दांचा वापर केला जाऊ शकत नाही. अशा शब्दांचा वापर हा सदनाच्या कार्यवाहीचा भाग नसेल.

संसदेचे सदस्य अनेकदा सभागृहात असे शब्द, वाक्य आणि अभिव्यक्तींचा वापर करतात, जे सभापती किंवा अध्यक्षांच्या आदेशाने रेकॉर्ड किंवा कार्यवाहीतून हटवले जातात. नियम ३८० अन्वये जर अध्यक्षांना चर्चेदरम्यान अपमानजनक किंवा अंससदीय, तसेच आक्षेपार्ह, असंवेदनशील शब्दांचा वापर केला आहे, असे वाटत असेल तर ते सभागृहाच्या कार्यवाहीतून त्यांना हटवण्याचा आदेश देऊ शकतात. तर नियम ३८१ अन्वये, सभागृहाच्या कामकाजातून जो भाग हटवायचा असतो, तो चिन्हित केल्यानंतर कार्यवाहीत एक नोट अशा प्रकारे टाकली जाते की अध्यक्षांच्या आदेशानुसार, ते हटवण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT