Lok Sabha Survey Saam Tv
देश विदेश

Lok Sabha Survey: लोकसभा निवडणुकीत भाजप ४०० पार? नव्या सर्वेक्षणातून आश्चर्याचा धक्का देणारी आकडेवारी

Lok Sabha Election News: लोकसभा निवडणुकी संदर्भात एक नवीन सर्वेक्षण समोर आलं आहे. यामध्ये भाजपची ताकद उत्तर प्रदेशात वाढू शकते, असं सांगण्यात आलं आहे.

Satish Kengar

Lok Sabha Survey:

आगामी लोकसभा निवडणूक जाहीर होण्यासाठी आता फक्त एक महिना शिल्लक राहिला आहे. एप्रिल आणि मे महिन्यात लोकसभा निवडणुका होणार असून देशभरात 7 टप्प्यात मतदान होणार असल्याचे बोलले जात आहे. यातच आता लोकसभा निवडणुकी संदर्भात एक नवीन सर्वेक्षण समोर आलं आहे. यामध्ये भाजपची ताकद उत्तर प्रदेशात वाढू शकते, असं सांगण्यात आलं आहे.

नवीन सर्वेक्षणानुसार, भाजपला येथे एकट्याला सुमारे 70 जागा मिळू शकतात. तर मित्रपक्ष अपना दललाही 2 जागा मिळण्याची शक्यता आहे. सपाला केवळ 7 तर काँग्रेसला 2 जागा मिळू शकतात. यातच महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये एनडीए आणि इंडिया आघाडीला किती जागा मिळू शकते? हे या सर्वेक्षणाच्या माध्यमातून जाणून घेऊ... (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

टाइम्स नाऊ वाहिनीच्या सर्वेक्षणात बिहारमधील लोकसभा जागांचा अंदाज मांडण्यात आला आहे. यानुसार नितीश कुमार यांच्या पक्षांतराचा मोठा फायदा एनडीएला होऊ शकतो. असं असलं तरी एनडीला 2019 च्या तुलनेत कमी असू शकतो, असं सर्वेक्षणात सांगण्यात आलं आहे. बिहारमध्ये एनडीएला 35 जागा मिळतील, असा अंदाज सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे.  (Latest Marathi News)

तर राजद, काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या आघाडीला केवळ 5 जागा मिळतील. राज्यात लोकसभेच्या एकूण 40 जागा आहेत. इंडिया टुडेच्या 'मूड ऑफ द नेशन' सर्वेक्षणानुसार, हिंदी पट्टा म्हटल्या जाणाऱ्या 10 राज्यांमध्ये भाजपला मोठी आघाडी मिळू शकते. या राज्यांतून 205 जागा एनडीएला मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

महाराष्ट्रात काय आहे परिस्थिती?

महाराष्ट्रात राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या फुटीनंतर दोन्ही पक्षाची ताकद कमी झाल्याचं दिसत असल्याचं सर्वेक्षणात सांगण्यात आलं आहे. राज्यात भाजपसोबत काँग्रेसची थेट लढत होऊ शकते, असं सर्वेक्षणात सांगण्यात आलं आहे. सर्वेक्षणात सांगण्यात आलं आहे की, राज्यातील लोकसभेच्या 48 जागांवर भाजप मजबूत स्थितीत आहे. सर्वेक्षण पाहता भाजप स्वबळावर 300 चा आकडा पार करेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Care: आठवड्यातून किती वेळा फेस स्क्रब केलं पाहिजे?

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Marathi bhasha Vijay Live Updates : लाडक्या बहिणीचं पोर्टल बंद, आता नव्याने नोंदणी होणार नाही - ठाकरे

Raj-Uddhav Thackeray Photo: राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र, मराठी माणसाला जे हवं तेच झालं, पाहा PHOTO

Marathi Bhasha Mumbai Worli Dome: जे बाळासाहेबांना जमलं नाही, ते फडणवीसांना जमलं - राज ठाकरेंचा टोला | VIDEO

SCROLL FOR NEXT