Lok Sabha Elections 2024 Saam Digital
देश विदेश

Lok Sabha Elections 2024: लोकसभा निवडणुकांआधी मतदार यादीतून हटवली १.६६ कोटी नावं; निवडणूक आयोगाच्या कृतीवर सर्वोच्च न्यायालयात याचिका

Voter List Election Commission News: आगामी लोकसभा निवडणुकांआधी निवडणूक आयोगाने १.६६ कोटी पेक्षा अधिक नावं मतदार यादीतून हटवली आहेत. याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून १२ फेब्रुवारीला पुन्हा सुनावणी होणार आहे.

Sandeep Gawade

Lok Sabha Elections 2024

आगामी लोकसभा निवडणुकांआधी निवडणूक आयोगाने १.६६ कोटी पेक्षा अधिक नावं मतदार यादीतून हटवली आहेत. तर २.६८ कोटी नवीन नावं यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत मतदान करणाऱ्या मतदात्यांची संख्या आता ९७ कोटीवर पोहोचली आहे. आसाम, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, राजस्थान, मिझोराम आणि तेलंगाना या ६ राज्यांना वगळून मतदात्यांचा फेरआढावा घेण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात दिली.

संविधान बचाओ ट्रसने मतदार याद्यांमधील बनावट नावं हटवून त्याची माहिती सार्वजनिक करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर मुख्य न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी यावर निवडणूक आयोगाला खुलासा करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान निवडणूक आयोगान न्यायालयासमोर मतदारांची आकडेवारी सादर करताना, मृत्यू झालेल्या व्यक्तींची आणि दोन वेळा समाविष्ट झालेली नावे मतदार यादीतून हटवण्यात आल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. यावर १२ फेब्रवारीला पुन्हा सुनावणी होणार आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

१ जानेवारी २०२४ पर्यंत २,६८, ८६, १०९ नवीन नावं मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत, तर बनावट नावं किंवा दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरीत झालेली १,६६,६१,४१६ नावं हटवली आहेत. तसेच देशात सध्या ९६,८२,५४,५६० मतदारांची नावं नोंद आहेत, ज्यात १.८३ कोटी नावं १८ ते १९ वयोगटातील आहेत.

निवडणूक आयोग वर्षातून एकदा SSR करतं. आसाममध्ये काही कारणांमुळे SSR करण्यात आला नव्हता.तर बाकीच्या पाच राज्यामंध्ये नुकताच विधानसभा निवडणुका झाल्या होत्या त्यामुळे त्या ठिकाणीही मतदार याद्यांची पडताळणी झाली नव्हती. मात्र इतर राज्यांमध्ये पडताळणी करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकांआधी ही शेवटची पडताळणी आहे.

दरम्यान याचिकाकर्त्याच्या वकिलांनी यावर आक्षेप नोंदवताना निवडणूक याद्यांमध्ये हे स्पष्ट होत नाही की किती नावं बनावट होती आणि किती हटवण्यात आली आहेत. उत्तर प्रदेशमधील जिल्हास्तरावरील निवडणूक आयोगाची कागदपत्र सादर करत त्यांनी यामध्ये किती लोक स्थलांतर झाले आणि किती मृत्यू झाले याची माहिती दिलेली नाही. शिवाय किती बनावट नावं कमी करण्यात आली याचीही स्पष्ट माहिती नसल्याचं त्यानी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे बंधु एकत्र आले, आता तुम्ही रडायला सुरुवात करा; संजय राऊतांचा खोचक टोला|VIDEO

Navi Mumbai Crime : कंपनीतून घरी परतताना तिघांवर हल्ला; दहा जणांविरोधात गुन्हा दाखल

Pune To Beed Travel: पुण्याहून बीडपर्यंतचा प्रवास कसा करावा? जाणून घ्या मार्ग, वेळ आणि प्रवासाच्या सोयी

Ashadhi Ekadashi 2025 : आषाढी एकादशी निमित्त खास माहिती, चंदनाचा टीका लावल्याचे फायदे

Ex Boyfriend zodiac sign: एक्स बॉयफ्रेंड तुमच्या आयुष्यात पुन्हा डोकावतोय? राशीनुसार जाणून घ्या त्याचा प्लान

SCROLL FOR NEXT