लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसह 195 जणांना तिकीट देण्यात आले आहे.
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी उमेदवारांची नावे जाहीर केले. विनोद तावडे म्हणाले यांनी सांगितलं की, 195 पैकी 28 आमची मातृशक्ती आहे. 50 वर्षांखालील 47 युवा उमेदवार, अनुसूचित जातीचे 27, अनुसूचित जमातीचे 18, मागासवर्गीय 57 उमेदवार आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
ते म्हणाले, पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने सेवा, सुशासन, गरीब कल्याण आणि सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास यावर लक्ष केंद्रित केले आहे. या मंत्राने केवळ देशातच नव्हे तर जागतिक पटलावर सेवेचे अप्रतिम उदाहरण मांडलं आहे. (Latest Marathi News)
तावडे म्हणाले, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतून, बिष्णू पदा रे अंदमान निकोबारमधून, केंद्रीय कायदा व न्याय मंत्री किरेन रिजिजू अरुणाचल पश्चिममधून, भाजप खासदार तापीर गाओ अरुणाचल पूर्वमधून निवडणूक लढवणार आहेत. केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल दिब्रुगडमधून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत.
अमित शाह गांधीनगरमधून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे विनोद तावडे यांनी सांगितले. याशिवाय मनसुख मांडविया गुजरातमधील पोरबंदरमधून निवडणूक लढवणार आहेत. याशिवाय मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान विदिशामधून निवडणूक लढवणार आहेत. तर ज्योतिरादित्य शिंदे मध्य प्रदेशातील गुनामधून निवडणूक लढवणार आहेत. दरम्यान, भाजपच्या पहिल्या यादीत महाराष्ट्रातील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.