भाजप लोकसभा निवडणूक २०२४ साठी पक्षाच्या उमेदवारांच्या नावावर विचारमंथन करण्यात येत आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची (CEC)दोन दिवशीय बैठक दिल्लीत सुरू आहे. एनडीएच्या मित्रपक्षांसोबत जागा वाटपाबाबतही चर्चा झाली. भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पक्षाने उत्तर प्रदेश, आसाम, छत्तीसगड, झारखंड आणि हरियाणामधील मित्रपक्षांसोबत जागा वाटपाचा निर्णय घेतलाय.
हरियाणा, छत्तीसगड, आसाममध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला
हरियाणातील सर्व १० जागांवर भाजप एकट्याने निवडणूक लढणार आहे. झारखंडमधील १४ पैकी १३ जागांवर भाजप स्वतः निवडणूक लढवणार आहे. आजूसला एक जागा दिली जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. छत्तीसगडमध्ये भाजप आपल्या सध्याच्या चार खासदारांचं तिकीट कापणार आहे.
तर सध्या भाजपचे ६ खासदार आहेत. २०२३ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपचे ९ खासदार होते, त्यापैकी ३ खासदार भाजपने विधानसभा निवडणुकीत उभे केले होते. आसाममध्ये भाजप लोकसभेच्या एकूण १४ राज्यातील ३ जागा आसाम गण परिषद आणि यूपीपीएलला देण्याची योजना आखलीय. ११ जागांवर निवडणूक लढवणार.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.