Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024 Saam Digital
देश विदेश

Lok Sabha Election 2024 : आप- काँग्रेस या पाच राज्यांमध्ये लढणार एकत्र निवडणूक; कोणाला किती जागा मिळाल्या? जाणून घ्या

Sandeep Gawade

Lok Sabha Election 2024

आगामी लोकसभा निवडुकांना सोमोरं जाण्यासाठी आणि भाजपला कडवी टक्कर देण्यासाठी इंडीया आघाडीतील अटक पक्ष एकत्र येत आहे. आम आदमी पक्ष आणि कॉंग्रेसमध्येही यावर प्रदीर्घ चर्चा झाल्यानंतर दिल्लीसह गुजरात, हरियाणा, गोवा आणि चंदिगढ या पाच राज्यांमध्ये दोन्ही पक्ष एकत्र निवडून लढणार आहेत. जागावाटपाचही गणित ठरलं असून दिल्ली आप ४ तर काँग्रेस ३ जागांवर निवडणुक लढणार आहे. यासंदर्भात आज दोन्ही पक्षांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. 'आप'कडून आतिशी, संदीप पाठक आणि सौरभ भारद्वाज, तर काँग्रेसकडून मुकुल वासनिक, दीपक बाबरिया आणि अरविंदर सिंग लवली पत्रकार परिषदेला उपस्थित होते.

या राज्यात आप ३ तर काँग्रेस २४ जागांवर निवडणूक लढवणार

आप आणि काँग्रेसची गुजरात, दिल्ली, हरियाणा, गोवा आणि चंदीगडमध्ये एकत्र निवडणुका लढणार आहेत. आम आदमी पक्ष दिल्लीत 4 जागांवर निवडणूक लढवणार आहे. तर काँग्रेसच्या पदरात चांदणी चौकसह ३ जागा पडल्या आहेत. तर चंदीगड लोकसभा आणि गोवातील दोन्ही जागांवर काँग्रेस उमेदवार देणार आहे. हरियाणात काँग्रेस ९ जागांवर तर आम आदमी पक्ष एका जागेवर, गुजरातमध्ये आम आदमी पक्ष ३ तर काँग्रेस २४ जागांवर निवडणूक लढवणार आहे. गुजरातमध्ये लोकसभेच्या २६, हरियाणात १०, दिल्लीत ७, गोव्यात २ आणि चंदीगडमध्ये १ जागा आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आपला मिळालेले मतदारसंघ

आम आदमी पार्टी दिल्लीतील नवी दिल्ली, पश्चिम दिल्ली, दक्षिण दिल्ली आणि पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. तर काँग्रेस ईशान्य, उत्तर पश्चिम आणि चांदणी चौक या जागांवर निवडणूक लढवणार आहे. गुजरातमध्ये आम आदमी पक्ष भरूच आणि भावनगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. तर हरियाणात कुरुक्षेत्र लोकसभा मतदारसंघातून उमेदवार उभा करणार आहे.

काँग्रेसचे नेते मुकुल वासनिक म्हणाले, इंडिया ब्लॉकमध्ये समाविष्ट असलेल्या पक्षांमध्ये जागावाटपावर चर्चा सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी लखनऊमध्ये सपा-काँग्रेस आघाडीची घोषणा करण्यात आली होती. तर AAP आणि काँग्रेसमध्ये जागावाटपावर दीर्घ चर्चा झाली, अखेर जागावाटपावर एकमत झालं. भारतीय लोकशाहीसमोरील आव्हानांचा सामना करण्यासाठी आप-काँग्रेसने लोकसभा निवडणूक एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. आपण आपापल्या चिन्हावर निवडणूक लढवू, पण एकदिलाने लढून भाजपचा पराभव करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhagan Bhujbal News : "मी कोणत्याही पक्षात जाणार नाही!" छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया

Chhagan Bhujbal News : छगन भुजबळ यांची शिवसेनेत घरवापसी होणार?

Pune Car Accident Video: पुण्यात चाललंय काय?, भरधाव कारने एकाला चिरडले; अपघात CCTV मध्ये कैद

Assembly Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार? महायुतीतील आमदारांची मागणी?

Chhagan Bhujbal: 'मी कुठल्याही पक्षात जाणार नाही', ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याचं वृत्त छगन भुजबळांनी फेटाळलं

SCROLL FOR NEXT