चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीची बिहारमध्ये २२ जागांवर आघाडी
बिराहमधील अनेक महत्त्वाच्या जागांवर LJPचा जोरदार प्रभाव
२०२० च्या तुलनेत यंदाची LJPची कामगिरी दमदार
बिहारच्या राजकारणात चिराग पासवान ठरताहेत 'गेमचेंजर'
बिहार विधानसभा निवडणुकीत चिराग पासवान यांच्या पक्ष लोक जनशक्ती पक्षाने जोरदार मुसंडी मारली आहे. एनडीएकडून २९ जागा घेऊन मैदानात उतरलेल्या लोक जनशक्ती पार्टी पक्ष २२ जागांवर आघाडीवर आहे. बिहारमध्ये गेमचेंजर ठरलेल्या चिराग पासवान यांच्या कामगिरीची देशभरात चर्चा होत आहे.
बिहारमध्ये २०२० विधानसभा निवडणुकीत भाजप आणि जनता दल पराभूत झालेल्या जागा चिराग पासवान यांच्या पदरात पडल्या होत्या. त्यातील २६ विधानसभा जागांवर लोक जनशक्ती पार्टीने आघाडी घेतली आहे. या मतदारसंघावर लोक जनशक्ती पार्टीने विजयाचा झेंडा फडकवला, तर लोकसभा निवडणुकीसारखी कामगिरी करण्यात यशस्वी ठरल्याचं बोललं जाईल.
लोकसभा निवडणुकीत लोक जनशक्ती पार्टीने पाच जागा जिंकल्या होत्या. विधानसभा निवडणुकीत चिराग पासवान यांचा पक्ष गेमचेंजर ठरताना दिसत आहे.
चिराग पासवान यांचा पक्ष लोक जनशक्ती पार्टीने रामविलास सुगौली, गोविंदगंज, बेलसंड, बहादुरगंज, कसबा, बलरामपूर, सिमरी बख्तियारपूर, बोचहां, दरौली, महुआ, परबत्ता, नाथनगर, ब्रह्मपूर , फतुहा, डेहरी, ओबरा, शेरघाटी, बोधगया, रजौली आणि गोबिंदपूर या जागांवर आघाडी घेतली आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीआधी चिराग पासवान यांनी एनडीएकडे ३५ जागा मागितल्या होत्या. पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीने लोकसभेत चांगली कामगिरी केली होती. त्याच आधारावर त्यांनी ३५ जागा मागत होते. मात्र, एनडीए त्यांना केवळ २०-२२ जागा मागत होते. मागच्या विधानसभा निवडणुकीत शेवटच्या क्षणाला एनडीएतून बाहेर पडले होते. मात्र, यंदा भाजपच्या नेत्यांनी चिराग पासवान यांची समजूत काढली. यावेळी पासवान यांनी २९ जागा घेतल्या. भाजप आणि जनता दल युनायटेड पराभूत झालेल्या २६ जागा त्यांना मिळाल्या. त्यातील दोन जागा अवघ्या १ हजार जागांनी एनडीएने गमावल्या होत्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.