वृत्तसंस्था: देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीच्या आयपीओची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणाच्या सुरुवातीला सांगितले की, 'एलआयसी आयपीओ लवकरच बाजारात येणार असल्याचे सांगितले आहे. यासोबतच या आर्थिक वर्षात हा आयपीओ आणण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे संकेत मिळत आहेत. (LIC IPO to hit the market soon nirmala sitharaman)
हे देखील पहा-
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अधिकृत घोषणेपूर्वी, DIPAM सचिव तुहिन कांत पांडे यांनी LIC IPO बद्दल सांगितले आहे. की सरकार मार्चअखेर शेअर बाजारात लिस्ट करेल. यासंदर्भात मर्चंट बँकर्सशी यापूर्वीही अनेक वेळा चर्चेच्या फेऱ्या झाल्या आहेत. त्याच वेळी, सरकारने अलीकडेच SEBI ला LIC IPO शी संबंधित कागदपत्रांची छाननी 3 आठवड्यांच्या आत पूर्ण करण्यास सांगितले आहे. जेणेकरून सरकार चालू आर्थिक वर्षातच ते पूर्ण करू शकणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.