Pakistan News
Pakistan News  Saam Tv
देश विदेश

Abdul Rehman Makki: अब्दुल रहमान मक्की दहशतवादी घोषित; थेट तुरुंगातून व्हिडीओ केला जारी

Shivaji Kale

Delhi News : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदने पाकिस्तानमधील हाफीज सईदचा कट्टर समर्थक दहशतवादी अब्दुल रहमान मक्कीला दहशतवादी घोषित केल्यानंतर त्यांनी एक व्हिडीओ जारी केला आहे. अब्दुल रहमान मक्कीने को लाहोरच्या कोट लखपतच्या जेलमधून एक व्हिडीओ जारी केला आहे. या व्हिडीओमध्ये मक्की ने अल-कायदा किंवा इस्लामिक स्टेटशी त्याचे कुठलेही सबंध नसल्याचे सांगतो. (Latest Marathi News)

अब्दुल रहमान मक्की व्हिडिओत म्हणाला की, 'कधीही अलकायदा प्रमुख ओसामा बिन लादेन, अयमान अल-जवाहिरी आणि अब्दुल्ला आजम ची कधीही भेट घेतली नाही. हा सर्व प्रोपोगंडा आहे'.

अल-कायदा प्रतिबंध समितीनुसार त्याला जागतिक दर्जाच्या यादीत सूचीबद्ध केलं आहे. गेल्या वर्षी चीनने (China) संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या दहशतवाद्यांच्या यादीत टाकायला विरोध केला होता. भारत आणि अमेरिकेने अब्दुल रहमानला या अगोदरच दहशतवादी घोषित केलं आहे.

दहशतवादासाठी पैसा उभा करणे, जम्मू आणि कश्मीरमध्ये दहशतवाद वाढवण्यासाठी योजना तयार करणे, जम्मू कश्मीरमध्ये तरुणांच्या मनात भारताविरोधात मत मांडून त्यांना उकसावणे. मुलांची भर्ती करणे ही काम अब्दुल करतो.

पाकिस्तानच्या (Pakistan) न्यायालयाने अब्दुल ला दहशतवादासंदर्भातील एका प्रकरणात त्याला दोषी ठरवलं होतं.

कोण आहे अब्दुल रहमान मक्की ?

अब्दुल रहमान मक्की हा मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदच्या दहशतवादी संघटनेचा सदस्य आहे. मक्की हा हाफीज सईदचा नातेवाईक आहे. भारताविरुद्धच्या कारवायात मक्की आघाडीवर असतो. मक्कीने मुंबईवर हल्ला करण्याचा कट रचला होता. जम्मू आणि काश्मीरमधील युवकांना दहशतवादी बनव्यात त्याचा हात आहे .

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today: आजचे राशिभविष्य, 'या' राशींच्या लोकांसाठी सोमवार ठरणार त्रासदायक; तुमची रास यात नाही ना?

Kalyan Lok Sabha: कल्याण लोकसभा मतदारसंघात राज ठाकरेंची सभा झाली तर आनंदच: श्रीकांत शिंदे

Maharashtra Politics: नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरेना? ठाकरेंच्या उमेदवाराची घौडदौड सुरुच

Maharashtra Politics 2024 : काँग्रेसचा विश्वजीत पैलवानासोबत; चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सक्रीय

Maharashtra Politics 2024 : माढ्याच्या मैदानात फडणवीसांचा डबल धमाका; मोहिते- पवारांच्या गटात लावला सुरुंग

SCROLL FOR NEXT