lesbian woman killed by her lover SAAM TV
देश विदेश

UP Crime News : समलिंगी महिलेला गर्लफ्रेंडशी करायचं होतं लग्न, लिंग बदलण्यासाठी मांत्रिकाला भेटली, भयंकर शेवट

Lesbian Woman Killed By Her Lover: ३० वर्षीय महिलेचे तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. तिला तरुणीसोबत लग्न करायचं होतं. लिंगबदल करण्यासाठी ही महिला मांत्रिकाकडे गेली.

Chandrakant Jagtap

Uttar Pradesh Crime News : उत्तर प्रदेशातील शहाजहानपूरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. समलिंगी प्रेमसंबंधांतून एका ३० वर्षीय महिलेची हत्या करण्यात आली आहे. या महिलेचे तरुणीशी संबंध होते. महिलेला तिच्यासोबत लग्न करायचं होतं. लिंगबदल करण्यासाठी ती एका मांत्रिकाकडे गेली. त्याच मांत्रिकाने या महिलेची हत्या केली. या हत्येमागील धक्कादायक कारण आता उघडकीस आले आहे.

माहितीनुसार, ३० वर्षीय महिलेचे तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. तिला तरुणीसोबत लग्न करायचं होतं. लिंगबदल करण्यासाठी ही महिला मांत्रिकाकडे गेली. या मांत्रिकाने तिची हत्या केली. हत्येनंतर मृतदेह खेरी जिल्ह्यातील जंगलात एप्रिलमध्ये जळालेल्या अवस्थेत आढळून आला. या भयंकर हत्याकांडामागील कारण समोर आलं आहे. ही हत्या महिलेच्या प्रेयसीच्या आईने घडवून आणल्याचे तपासात उघड झाले आहे.

पूनम असं हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. पदव्युत्तर पदवीपर्यंत तिचं शिक्षण झाले होते. २६ एप्रिल रोजी पूनम बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात दाखल केली. १८ जून रोजी पोलिसांना तिचा मृतदेह जंगलात आढळून आला. पोलीस तपासात या हत्येचे गूढ उकळले.

२०१९ पासून पूनम ही प्रीती नावाच्या तरुणीला डेट करत होती. या दोघींचे प्रेमसंबंध होते. प्रीतीनं प्रेमसंबंधांबाबत आईला सांगितलं होतं. जर लग्न करायचं असेल तर, पूनमला लिंगबदलासाठी मांत्रिकाला भेटावं लागेल, असे आईने प्रीतीला सांगितलं होतं. त्यानंतर पूनम ही रामनिवास उर्फ दिलीप कुमार याच्या संपर्कात आली. लिंगबदल करण्यासाठी पैसे आणि दागिने घेऊन ये अशी बतावणी त्याने पूनमकडे केली. तिनेही मांत्रिकाच्या सांगण्यानुसार केले. (Crime News)

जंगलात नदीच्या काठावर नेलं अन्....

मांत्रिकाने पूनमला खेरी जिल्ह्यातल्या जंगलात नदीकाठी नेलं. तिथं पूजा घातली. त्यानंतर कुऱ्हाडीने तिचा गळा चिरला. धक्कादायक बाब म्हणजे पूनमची हत्या गर्लफ्रेंड आणि तिच्या आईसमोरच केली. पूनमला संपवण्यासाठी मांत्रिकाला दीड लाख रुपये दिले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. (Marathi Tajya Batmya)

हत्येचं गूढ उकललं

शहाजहानपूरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक एस. आनंद यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले की, पीडित महिलेच्या कॉल रेकॉर्डमधून प्रीती आणि रामनिवास यांची नावे समोर आली. रामनिवास मांत्रिक असल्याचीही माहिती मिळाली. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता, प्रीतीच्या आईच्या सांगण्यावरून पूनमची हत्या केल्याची कबुली त्याने दिली. प्रीतीला या कटाबद्दल सर्व माहिती होती, पण तिने याबद्दल कोणतीही माहिती दिली नाही. त्यामुळे तिचंही नाव एफआयआरमध्ये नोंदवण्यात आले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supplements: 'हे' सप्लीमेंट्स चुकूनही एकत्र घेऊ नका नाहीतर, आरोग्यावर होईल परिणाम

Maharashtra Politics : काँग्रेसला मोठा झटका, नाना पटोले यांचे निकटवर्तीय भाजपात जाणार

Ahilyanagar News: विद्यार्थी की मजूर? शाळा मग्रुर; मुलांना ट्रक खाली करायला लावला, सामच्या बातमीच्या दणक्यानंतर होणार कारवाई

Nepal Protest : नेपाळ पेटलं, चटके भारताला? शेजाऱ्यानं वाढवलं देशाचं टेन्शन, VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंना धक्का बसणार? नाराज पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी केला फोन, Video

SCROLL FOR NEXT