Leopard Attack Video : बिबट्याला सर्वात खतरनाक प्राणी म्हणून ओळखलं जातं. गर्द झाडीत लपून तो आपल्या शिकारीवर हल्ला चढवतो. एकदा का शिकार दिसली तर बिबट्या तिला सहजा-सहजी सोडत नाही. भरवस्तीत जाऊन सुद्धा तो शिकार करतो. त्यामुळे बिबट्याचं (Leopard Attack) नाव ऐकताचं अनेकांना धडकी भरते. अशाच एका खतरनाक बिबट्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. (Leopard Attack Viral Video)
या व्हिडीओत एका सायकलवर जाणाऱ्या व्यक्तीवर बिबट्या (Leopard) अचानक हल्ला करतो. मात्र, नशीब बलवंत्तर म्हणून हा व्यक्ती बिबट्याच्या तावडीतून वाचतो आणि तेथून पळ काढतो. अंगावर काटा आणणाऱ्या या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. साधारण ६० सेकंदाचा हा व्हिडीओ आसामधील काझीरंगा पार्कमधील असल्याचं बोललं जातंय.
नेमकं काय घडलं?
व्हिडीओमध्ये एक व्यक्ती आपल्या सायकलवर स्वार होऊ रस्त्याने जाताना दिसत आहे. रस्त्यात तशी गाड्यांची वर्दळ आहे, मात्र हा रस्ता घनदाट जंगलातील असल्याचं दिसत आहे. हा व्यक्ती आपल्या सायकलवर रस्त्याने जात असताना अचानक जंगलातून एक बिबट्या येतो आणि त्याच्यावर झडप घालतो.
बिबट्याने अचानक हल्ला केल्यानंतर हा सायकलस्वार व्यक्ती खाली पडतो. बिबट्याला पाहताच त्याची हवा टाईट होते. मात्र, त्याचवेळी पाठीमागून येत असलेल्या गाडीला बघून हा पुन्हा जंगलाच्या दिशेने झेप घेतो. बिबट्या दूर गेल्याचं बघताच हा व्यक्ती झटपट उठतो आणि तेथून दूर उभ्या असलेल्या इतर व्यक्तींजवळ येऊन उभा राहतो.
थरकाप उडवणारा हा व्हिडीओ IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. काझीरंगा येथील अधिकाऱ्यांनी बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात जानेवारीमध्ये हादरवून सोडणारी घटना कैद झाली होती, असंही त्यांनी व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहलं आहे. आतापर्यंत या व्हिडीओला २ लाखांहून अधिक लोकांनी पाहिलं आहे. व्हिडीओ बघून नेटकरी सुद्धा अचंबित झाले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.