Baahubali Lyricist Shiv Shaktidatta No More Saam TV News
देश विदेश

बाहुबली फेम प्रसिद्ध कलाकाराचं निधन; मुलगा ऑस्कर विजेता, सिनेसृष्टी शोकसागरात बुडाली | Bahubali

Baahubali Shiv Shaktidatta No More: प्रसिद्ध गीतकार आणि एम.एम. कीरवाणी यांचे वडील शिव शक्तिदत्ता यांचं निधन. बाहुबलीसह अनेक चित्रपटांना गीत दिलं. चित्रपटसृष्टीत शोककळा. हैदराबादमध्ये घेतला अखेरचा श्वास.

Bhagyashree Kamble

चित्रपटसृष्टीतून एक हृदयद्रावक बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध गीतकार, पटकथालेखक आणि निर्माता शिव शक्तिदत्ता यांचं वयाच्या ९२व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांनी सोमवारी हैदराबादमधील मणिकोंडा येथील निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. वयोमानामुळे त्यांची प्रकृती काही काळापासून खालावली होती. शिव शक्तिदत्ता यांच्या निधनामुळे मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे.

शिव शक्तिदत्ता हे केवळ गीतकारच नव्हते, पटकथा लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता देखील होते. त्यांनी अनेक तेलुगू चित्रपटांसाठी काम केलं आहे. विशेष म्हणजे त्यांनी प्रभासच्या ब्लॉकबस्टर चित्रपट बाहुबली चित्रपटातील शीर्षक गीत लिहिले होते. त्यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण इंडस्ट्री शोकसागरात बुडाली आहे.

शिव शक्तिदत्ता यांच्या लिखाणाची वेगळीच शैली होती. शिव शक्तिदत्ता हे सुप्रसिद्ध संगीतकार आणि ऑस्कर पुरस्कार विजेते एम.एम. कीरवाणी यांचे वडील होते. त्यांनी आरआरआरमधील प्रसिद्ध नाटू नाटू या गाण्यासाठी संगीत दिलं. त्यांच्या निधनामुळे दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही शोककळा पसरली आहे.

पवन कल्याण आणि चिरंजीवी यांनी दु:ख केलं व्यक्त

शिव शक्तिदत्ता यांच्या निधनानंतर, अभिनेते, नेते आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच मेगास्टार चिरंजीवी यांनीही तेलुगू भाषेत शिव शक्तिदत्ता यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच चाहत्यांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहत शोक व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

Bigg Boss Marathi 6 Winner : अर्ध्यावर सोडली मालिका अन् थेट बिग बॉसमध्ये एन्ट्री, 'टास्क क्वीन'चा प्रवास कसा होता?

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलतेनं उचलली 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी; राकेश बापटला दिली मात, बक्षिसात काय काय मिळाले? VIDEO

Bigg Boss Marathi 6 Grand Finale : फिनालेच्या शर्यतीतून 'हा' स्पर्धक OUT, मास्टर माइंडचा खेळ संपला | VIDEO

SCROLL FOR NEXT