Viral Video  Saam TV
देश विदेश

Viral Video : बायको कशीही मिळो, पण सासू अशीच हवी; सासूने नवरदेवाला नको ती गोष्ट देत केलं भन्नाट स्वागत... पाहा व्हिडीओ

Wedding Video : वराच्या ओठांमध्ये सासूने सिगरेट दिली असून सासऱ्यांनी त्याला पेटवण्यासाठी माचीस पेटवून दिले आहे.

साम टिव्ही ब्युरो

Wedding Viral Video : लग्न करताना प्रत्येक मुलीचे आई वडील मुलाची कसून चौकशी करत असतात. त्या मुलाला कोणतं व्यसन आहे का? तो दारू, सिगरेट, तंबाखू अशी व्यसने करतो का? या सर्वांची शहानीशा करतात. अशात आता सोशल मीडियावर लग्नाचा एक भन्नाट व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला देखील अशीच सासू मिळावी असं वाटेल. (Latest Marathi News)

मुलाला विविध व्यसने असतील तर कोणतेही आई वडील आपल्या मुलीचा हात त्या मुलाच्या हातात देत नाहीत. दारू, सिगरेट तर सर्वच जण पितात मात्र आपल्या सासू सासऱ्यांसमोर ही व्यसने करण्याची कोणत्याही मुलाची हिंमत होत नाही. मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये चक्क एका सासूने जावयाला सिगरेट देत त्याचं स्वागत केलं आहे.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लग्नामध्ये सर्व नटूनथटून आले आहेत. वधू आणि वर दोघांकडे सर्वांच लक्ष वेधलं आहे. नवरदेव आल्यावर प्रत्येक ठिकाणी त्याचे जंगी स्वागत केले जाते. काही ठिकाणी नवरदेवाचे पाय धुन्याची देखील रीत आहे. अशात या लग्नात मुलाला त्याच्या सासूने चक्क सिगरेट दिली आहे. वराच्या ओठांमध्ये सासूने सिगरेट दिली असून सासऱ्यांनी त्याला पेटवण्यासाठी माचीस पेटवून दिले आहे.

हा व्हिडिओ (Video) आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. सर्वच तरुण मुलं यावर विविध प्रतिक्रीया देत आहेत. व्हिडिओ पाहून काही तरुणांनी कमेंटमध्ये म्हटलं आहे की, आम्हला देखील अशीच सासू पाहिजे होती. तर आणखीन एकाने असे सासू सासरे कुठे मिळतात असं विचारलं आहे. joohiie या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ७ फेब्रुवारी रोजी व्हिडिओ पोस्ट करण्यात आला असून आतापर्यंत त्यावर २५ लाखांच्या घरात व्ह्युव्ज मिळाले आहेत.

हा व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या अकाउंटवर त्याची सत्यता देखील सांगण्यात आली आहे. दक्षिण भारतामधील काही गावांमध्ये ही परंपरा असल्याचे यात म्हटले आहे. ही फक्त जूनी परंपरा असून यामध्ये सिगरेट पेटवली जातनाही. तसेच नवरदेव ती सिगरेट पित देखील नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईकरांनो इथे लक्ष द्या! रेल्वेच्या कोणत्या मार्गावर मेगा ब्लॉक? पहा वेळापत्रक

Maharashtra Live News Update: धावत्या पीएमपीएमएल इलेक्ट्रिक बसने घेतला पेट

Bigg Boss 19: झिशान कादरीने तान्या मित्तलला दिला धोका; बिग बॉसच्या घरात नेमंक चाललंय तरी काय?

Pune : महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी आणखी गोड होणार, बोनससह सानुग्रह अनुदानात वाढ

Chanakya Niti: खुश राहण्यासाठी 'या' सिक्रेट टिप्स करा फॉलो, चाणक्यांचा खास सल्ला

SCROLL FOR NEXT