Gold Silver Price Hike  Saam Tv
देश विदेश

Gold Silver Price Hike : लग्नसराईच्या मुहूर्तावर सोन्याच्या भावात विक्रमी वाढ; चांदीचा दरही उंचावला, तपासा आजचे दर

Gold Price In Maharashtra : मागच्या आठवड्या सोन्या-चांदीच्या दरात वाढ व किंचित घट झालेली पहायला मिळाली.

कोमल दामुद्रे

Sona Chandi Bhav : मागच्या आठवड्या सोन्या-चांदीच्या दरात वाढ व किंचित घट झालेली पहायला मिळाली. शुक्रवारी नोंद झाल्यानुसार सोन्याच्या किमतीत किंचित घट झाली होती परंतु, सोन्याचा भाव हा ६१ हजारांवरच होता.

जागतिक ट्रेंडमध्ये सोन्या-चांदीचे भाव भारतीय सराफ बाजारात (Market) आज पुन्हा वाढले आहेत. नोंद झाल्यानुसार 1 ग्रॅम सोने 6,148 रुपयांवर आले आहे. एक किलो चांदीचा भाव 73,220 रुपये आहे.

ऐन लग्नसराईच्या मुहूर्तावर सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्यामुळे ग्राहकांना खरेदीसाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहे. बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 55,944 रुपये आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याची 10 ग्रॅमसाठी 61,030 किंमत आहे.

तसेच पुण्यात व नागपूरमध्ये देखील मुंबईसारखे भाव असतील. त्यासाठी ग्राहकांना १० ग्रॅम सोन्याच्या दरामागे अधिक पैसे मोजावे लागणार आहे.

1. 22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

2.  हॉलमार्कचे (Hallmark) सोनं कसे खरेदी कराल?

सोनं (Gold) खरेदी करताना आपण त्याची गुणवत्ता तपासायला हवी. हॉलमार्कचे चिन्ह असल्यावरच ते खरेदी करा. यामध्ये याची हमी सरकार आपल्याला देते. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सिगारेट, पैशांच्या बॅगा आणि मंत्री शिरसाट; संजय राऊतांचा व्हिडीओ पोस्ट करत मोठा गौप्यस्फोट

मराठी-हिंदी वादात ब्रिजभूषण सिंहांची उडी,ठाकरेंना थेट धमकी

गौरवास्पद! UNESCO च्या यादीत पुण्यातील तीन किल्ल्यांचा समावेश | VIDEO

Government Scheme : मुलांसाठी सरकारची नवी योजना? मुलांना महिन्याला 3 हजार?

Sleeping Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार झोपण्याची योग्य दिशा कोणती?

SCROLL FOR NEXT