लालूप्रसाद यादव  Saam Tv
देश विदेश

Fodder Scam: चारा घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव दोषी; आज सुनावणी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था: राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांच्याकरिता आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा असणार आहे. आज रांची मधील विशेष सीबीआय कोर्ट दोराडा चारा घोटाळा प्रकरणी शिक्षा सुनावली जाणार आहे. १५ फेब्रुवारी दिवशी न्यायालयाने (court) लालू प्रसाद यादव यांना या प्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. या पाचव्या प्रकरण अगोदरच लालू यादव यांना इतर ४ प्रकरणांमध्ये १४ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. १३९ कोटी रुपयांच्या चारा घोटाळा (Fodder Scam) प्रकरणी १५ फेब्रुवारी दिवशी लालू प्रसाद यादव यांना दोषी ठरवण्यात आले आहे. (Lalu Prasad Yadav convicted in fodder scam case)

हे देखील पहा-

लालू प्रसाद यादव यांच्याबरोबरच ३८ दोषींच्या शिक्षेवर आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे शिक्षा सुनावण्यात येणार आहे. या अगोदर १५ फेब्रुवारी दिवशी विशेष सीबीआय (CBI) न्यायालयाचे न्यायाधीश एस. के. शशि यांनी ४१ जणांना दोषी ठरवले होते. २१ फेब्रुवारी दिवशी शिक्षेवर सुनावणी निश्चित केली होती. आज यापैकी ३८ जणांना शिक्षा होणार आहे. अन्य ३ दोषी १५ फेब्रुवारीला न्यायालयात हजर झाले नाही. त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. ज्या ३८ जणांना आज शिक्षा सुनावण्यात येणार आहे. त्यापैकी ३५ जणांना बिरसा मुंडा तुरुंगात कैद करण्यात आले आहेत.

लालू प्रसाद यादव, डॉ. के.एम. प्रसाद आणि यशवंत सहाय यांना प्रकृतीच्या कारणास्तव राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (RIMS) मध्ये दाखल करण्यात आले आहे. चारा घोटाळा प्रकरणी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे दोषींना शिक्षेकरिता हजर केले जाणार आहे. बिरसा मुंडा तुरुंग अधीक्षक हमीद अख्तर यांनी दिलेल्या माहितीनुसार की, न्यायालयात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे लॅपटॉपची व्यवस्था करण्यात आली आहे. आज १२ वाजता न्यायालयात सुनावणी सुरु होणार आहे.

या सुनावणीमध्ये दोषींना शिक्षा सुनावण्यात येणार आहे. न्यायालयाने लालू प्रसाद यादव यांना भारतीय दंड संहितेच्या कलम ४०९, ४२०, ४६७, ४६८, ४७१ कट रचण्याशी संबंधित कलम १२० बी आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १३(२) अंतर्गत दोषी ठरवले जाणार आहे. या कलमांनुसार, त्याला ७ वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकणार आहे. लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळ्याच्या ४ वेगवेगळ्या प्रकरणात या अगोदर १४ वर्षांची शिक्षा झाली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

Petrol Diesel Price : विधानसभेच्या आधी राज्य सरकार मोठा निर्णय घेणार, पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात?

SCROLL FOR NEXT