आमचे हिंदुत्व सुडाचे नाही; देशातलं राजकारण खालच्या पातळीवर- उद्धव ठाकरे

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटण्याकरिता आज मुंबईत दाखल झाले
आमचे हिंदुत्व सुडाचे नाही; देशातलं राजकारण खालच्या पातळीवर- उद्धव ठाकरे
आमचे हिंदुत्व सुडाचे नाही; देशातलं राजकारण खालच्या पातळीवर- उद्धव ठाकरेSaam Tv
Published On

मुंबई : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (Telagana CM K Chandrashekhar Rao) हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (Maharashtra CM Uddhav Thackeray) भेटण्याकरिता आज मुंबईत दाखल झाले आहेत. दोघांमध्येही चर्चा रंगली आहे. केंद्रातील भाजप सरकार विरोधात तिसरी आघाडी निर्माण करण्याचे संकेत नुकतेच केसीआर यांनी दिले होते. त्याच घडामोडींना वेग आला असून आज केसीआर आणि उद्धव ठाकरेंमध्ये दीड तासापासून बैठक सुरु होती.

हे देखील पहा-

देशात सध्या सुडाचे राजकारण खालच्या पातळीवर सुरू आहे. आमचे हिंदुत्व सुडाचे नाही, मुख्यमंत्री, पंतप्रधान कोण बनेल ते नंतर पाहू सुरुवात आम्ही करत आहोत. देशाचा विचार घेऊन बदल करू महाराष्ट्र, तेलंगणाला १ हजार किमी ची सीमा आहे. राज्य गेले खड्यात देश गेला खड्यात असे सध्या राजकारण सुरू आहे. चांगली दिशा आम्ही दोघांनी मिळून ठरवली आहे.

आमचे हिंदुत्व सुडाचे नाही; देशातलं राजकारण खालच्या पातळीवर- उद्धव ठाकरे
Shocking ! दगडाने ठेचून तरुणाची निर्घृण हत्या, घटनेने धुळे हादरलं

केंद्रातील भाजप सरकारकडून बिगर भाजपशासित राज्यांवर अत्याचार होत आहेत. केंद्राकडून मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला जात आहे. त्यामुळे केंद्रातील भाजपला उत्तर देणे गरजेचे आहे. त्याकरिता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे सातत्याने प्रयत्न करत आहेत. त्याकरिता शरद पवार आमचे मार्गदर्शक आहेत. तिसऱ्या आघाडीसंबंधी राजकीय चर्चा करण्यासाठीच आज केसीआर उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याचं संजय राऊतांनी सांगितले होते.

मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकींमध्ये नेहमी आदित्य ठाकरे यांची उपस्थित असते. तेजस ठाकरे नेहमी त्यांच्या कामात गुंतलेले असतात. पण, आज आदित्य ठाकरे मुंबईत नाहीत. त्यामुळे आज तेजस ठाकरे उद्धव ठाकरे आणि केसीआर यांच्या बैठकीत दिसून आले. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com